
पिंपल्स आणि ऑयली स्किनमुळे त्रस्त आहात? मग 'या' पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, त्वचेच्या समस्या होतील नष्ट
गुलाब पाणी वापरण्याचे फायदे?
कोणत्या त्वचेसाठी गुलाब पाणी आहे उत्तम?
गुलाब पाणी लावण्याची योग्य पद्धत?
सर्वच महिलांना आपली त्वचा डागविरहित आणि देखणी हवी असते. चेहऱ्यावरील तेल वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वातावरणात सतत होणारे बदल, बदलेली जीवनशैली, मानसिक तणाव, अपुरी झोप आणि कमी पाण्याच्या सेवनामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात. तसेच धूळ, मातीच्या सानिध्यात जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि ऍक्ने घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. चेहऱ्यावर साचून राहिलेल्या अतिरिक्त तेलामुळे खूप जास्त पिंपल्स येऊन त्वचा निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
Stomach Massage: पोटाचा मसाज देऊ शकतो बद्धकोष्ठता-ब्लोटिंगपासून सुटका, कसे जाणून घ्या
त्वचा निस्तेज झाल्यानंतर कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण त्याऐवजी गुलाब पाण्याचा वापर करावा. त्वचेवर वाढलेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाण्यात असलेले आयुर्वेदिक गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून बनवलेले पाणी पिंपल्स आणि ऍक्ने नियंत्रणात करण्यास मदत करतात. त्यामुळे इतर केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी गुलाब पाण्याचा वापर कशा पद्धतीने करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. गुलाब पाण्याच्या वापरामुळे त्वचेवर आलेले पिंपल्स कमी होतील.
आहारात होणारे बदल, धूळ माती किंवा डिहायड्रेशनमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तर काहीवेळा शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. अशावेळी कोणत्याही महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाण्याच्या वापारामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. गुलाब पाणी लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्वचा पुसून त्यावर गुलाब पाणी स्प्रे करावे आणि काहीवेळ सुकण्यासाठी तसेच ठेवा. यामुळे त्वचेमध्ये थंडावा वाढेल.
Festive Look: सणासुदीला परफेक्ट लुक, ५ संकेतांकडे दुर्लक्ष पडू शकतं महाग; कसे ओळखाल?
उन्हामुळे त्वचा खूप जास्त तेलकट आणि थकल्यासारखी झाल्यास गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाणी लावल्यामुळे त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच त्वचेमध्ये थंडावा टिकून राहील. गुलाब पाणी केवळ त्वचेवर नाहीतर मान, गळा आणि हातांवर सुद्धा लावावे. अंघोळ केल्यानंतर त्वचा स्वच्छ केल्यास हातांवर आणि त्वचेवर गुलाब पाणी लावल्यास खूप फ्रेश वाटेल. याशिवाय अंघोळीच्या पाण्यात गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास त्वचेमध्ये थंडावा कायम टिकून राहील. पण गुलाब पाण्याचा वापर करताना त्वचेला सूट होईल की नाही याची खात्री करून नंतरच गुलाब पाण्याचा वापर करावा.
Ans: गुलाब पाणी त्वचेला ताजेतवाने आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकते. मात्र पिंपल्सवर हा निश्चित उपचार नाही. वारंवार किंवा गंभीर मुरुम होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Ans: चेहरा सौम्य फेसवॉशने स्वच्छ केल्यानंतर स्वच्छ कॉटन पॅड किंवा हाताने गुलाब पाणी हलक्या हाताने लावू शकता. त्यानंतर त्वचेला अनुरूप मॉइश्चरायझर वापरणे महत्त्वाचे आहे.
Ans: त्वचेला ते अनुकूल असल्यास रोज वापरता येऊ शकते. मात्र जळजळ, खाज, लालसरपणा किंवा त्वचेची आग होऊ लागल्यास वापर त्वरित थांबवा.