फोटो सौजन्य - Social Media
माघी गणेशोत्सव हा गोड पदार्थांच्या स्वादाने समृद्ध असतो. या सणानिमित्त मोदकांसारख्या पारंपरिक गोड पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो. परंतु आजच्या काळात आरोग्याबाबत जागरूकता वाढलेली आहे. विशेषतः मधुमेह किंवा इतर आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी गोड पदार्थांचा आनंद घेणे अवघड होऊ शकते. त्यामुळे सणाचा आनंद गमावू न देता आरोग्यदायी पर्याय तयार करणे महत्त्वाचे ठरले आहे. याच उद्देशाने फोर्टिस हॉस्पिटल, कल्याणच्या क्लिनिकल डाएटीशियन सुमैया ए. यांनी आरोग्यदायी आणि स्वादिष्ट अशा दोन प्रकारच्या मोदकांची पाककृती सुचवली आहे. या रेसिपींना यंदाच्या माघी गणेशउत्सवासामध्ये तयार करा आणि या सणाला स्वादिष्ट आणि आरोग्यास सुलभरित्या साजरी करा.
ओट्स-बदाम मोदक
हे मोदक प्रोटीन, फायबर आणि आरोग्यदायी फॅट्सने समृद्ध असतात. ओट्स, बदाम, खजूर आणि बियांच्या मिश्रणामुळे हे मोदक पौष्टिक आणि स्वादिष्ट होतात. नियमितपणे खाल्ल्यास ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
साहित्य:
बाह्य आवरणासाठी:
सारणासाठी:
कृती:
गाजराचे मोदक
गाजराचे मोदक व्हिटॅमिन ए, अॅण्टीऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीनने समृद्ध असतात. गाजरासोबत बदाम, काजू आणि गूळ यामुळे हे मोदक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. गाजरांमध्ये अॅण्टीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते शरीराच्या प्रतिकारशक्तीला बूस्ट करतात.
साहित्य:
कृती:
हे दोन्ही प्रकार अत्यंत आरोग्यदायी असून गोड पदार्थांचा आनंद घेण्यासोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेता येते. जर तुम्ही आरोग्यदायी जीवनशैली राखू इच्छिता, तर या मोदकांचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता.