फोटो सौजन्य: Social Media
आयुष्यात अनेक सोनेरी क्षण येतात, त्यापैकीच एक मोलाचा आणि आठवणीत राहणारा क्षण म्हणजे लग्न. लग्नात फक्त दोन व्यक्ती एकत्र येत नसतात, तर दोन कुटुंब देखील एकत्र येत असतात. एखाद्या घरात लगीनघाई असेल तर त्या घरातील वातावरण प्रफुल्लीत होऊन जाते. पण अनेक जणांच्या मनात लग्नाबाबत एक सामान्य प्रश्न नेहमीच घुटमळत असतो. तो म्हणजे लग्न करण्याचे योग्य वय कोणते?
खरंतर बदलत्या काळ आणि वातावरणानुसार, लग्नासाठी वयोमर्यादा वाढत आहे. पूर्वी मुलींचे लग्न १४ व्या वर्षी होत असे, आज मुली ३० वर्षांच्या होईपर्यंत लग्न करत नाहीत. तसेच पूर्वी लहान वयातच मुलामुलींची लग्न होत असत पण आता प्रत्येकाला लग्न कोणत्या वयात करावे हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.
लठ्ठपणामुळे त्रासले आहात? ‘हा’ घ्या मंत्र, अनेक अभिनेतेही करतात फॉलो
काही वेळा असेही मानले जाते की लवकर लग्न केल्याने जीवन आनंदी होते. परंतु काही स्टडी आपल्याला लग्नाचे नवीन पैलू आणि त्याचे यश समजून घेण्यास मदत करू शकतात. स्टडीत असे आढळून आले की २८ ते ३२ हे लग्नासाठी योग्य वय आहे. जोडीदार एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम असतात. त्यातही ४० नंतर लग्न केल्याने घटस्फोटाची शक्यता कमी होते.
युटा विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ निक वुल्फिंगर यांनी २००६-२०१० आणि २०११-२०१३ या कालावधीतील नॅशनल सर्व्हे ऑफ फॅमिली ग्रोथ या सर्वेक्षणातील डेटाचे विश्लेषण केले. यानुसार, २८ ते ३२ वर्षांच्या दरम्यान लग्न करणाऱ्या जोडप्यांना घटस्फोटाचा धोका कमी असतो, विशेषतः पहिल्या ५ वर्षांत. या वयात, लोकांमध्ये त्यांच्या जीवनाबद्दल जबाबदारी आणि समजूतदारपणा विकसित झाला असतो, ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होण्यास मदत होते.
वुल्फिंगरच्या अभ्यासानुसार, जसजसे तुम्ही मोठे होता तसतसे घटस्फोटाची शक्यता कमी होते, परंतु 32 वर्षांच्या वयानंतर, ही शक्यता पुन्हा वाढू लागते. ३२ वर्षांनंतर घटस्फोटाचे प्रमाण दरवर्षी ५% ने वाढते, विशेषतः जेव्हा लोक तीसच्या उत्तरार्धात आणि चाळीशीच्या सुरुवातीला असतात. या वयात, नात्यात तणाव आणि तडजोडीचा अभाव असू शकतो, ज्यामुळे घटस्फोटाचा धोका वाढण्याची भीती आहे.
समाजशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की लग्नासाठी सर्वोत्तम वय हे २८ ते ३२ आहे. या वयापर्यंत, व्यक्तीला त्याचे वैयक्तिक जीवन, जबाबदाऱ्या आणि गरजा समजल्या असतात. तसेच ते आर्थिकदृष्ट्या स्थिर देखील असतात. म्हणून कुटुंब सुरू करण्यासाठी हा काळ योग्य मानला जातो. इतकेच नाही तर या वयात जोडपे एकमेकांशी चांगले समन्वय साधू शकतात.
Happy लव्ह लाईफ पाहिजे? हे घ्या सिक्रेट टिप्स, नात्यात राहील फक्त नि फक्त आनंद
मेरीलँड विद्यापीठाचे समाजशास्त्रज्ञ फिलिप कोहेन यांनी देखील एक अभ्यास केला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ४५ ते ४९ वयोगटात लग्न केल्याने घटस्फोटाची शक्यता कमी होऊ शकते. त्यांचा असा विश्वास आहे की मोठ्या वयात लग्न केल्याचा असा अर्थ नसतो की हे नाते जास्त काळ टिकणारच नाही. खरंतर, या वयात दोघेही अधिक हुशार आणि प्रौढ असतात, ज्यामुळे नाते टिकवून ठेवण्यास मदत होते.