Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली

मध्य प्रदेशातील एका ठिकाणी अनेक वर्षांपासून एक अनोखी आणि श्रद्धेने जोडलेली धार्मिक परंपरा जपली जात आहे. या परंपरेत भक्तांचा सहभाग मोठ्या उत्साहाने पाहायला मिळतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 02, 2026 | 09:10 AM
देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली

देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली

Follow Us
Follow Us:
  • धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भक्तांमध्ये मोठी उत्सुकता आणि स्पर्धा दिसून येते.
  • विशेष विधी आणि परंपरांमुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते.
  • या अनोख्या प्रथेमुळे दूरदूरवरून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
हिंदू धर्मानुसार देवी-देवतांना आपले मायबाप समजून त्यांना पूजले जाते, मनोभावनेने त्यांची पूजा केली जाते. पण तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की माणसाने देवांना दत्तकं घेतलं. ही संकल्पना ऐकायला विचित्र वाटत असली तरी फार जुन्या काळापासून मध्य प्रदेशातील खांडवा येथे याचे पालन केले जात आहे. येथील जैन समाजात एक अनोखी प्रथा आहे जिथे लोक देवाचे आई-वडिल होण्यासाठी केवळ प्रार्थनाच करत नाही तर त्यासाठी पैशांची बोली देखील लावतात. एका दगडात प्राण फुंकण्याचा तो पवित्र क्षण आणि साक्षात देवाचे आई-वडील होण्याचे परम भाग्य एक अद्भूत अनुभव देऊन जातो.

फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी

लहान मुलांना दत्तक घेता येते हे तर आपण ऐकले आहे पण भगवत्तांना दत्तक घेण्याची गोष्ट सर्वांनाच थक्क करणारी आहे. मध्य प्रदेशातील खांडवा येथे जैन समाजात एक हृदयस्पर्शी परंपरा आहे. येथे भक्त देवाचे पालक होण्यासाठी प्रार्थना करतात. हे विचित्र वाटू शकते पण खांडवा येथील जैन समाज गेल्या ४५ वर्षांपासून ही परंपरा जपत आहे. जैन समाजात ही एक अत्यंत पवित्र दुर्मिळ संधी मानली जाते ज्यासाठी लोक वर्षानुवर्षे तपश्चर्या आणि त्याग करतात.

दगडापासून देवत्वापर्यंतचा पवित्र प्रवास

वास्तविक पाहता, खांडवा येथील ४५ वर्षे जुन्या महावीर दिगंबर जैन मंदिरात भव्य पाच दिवसीय पंच कल्याणक उत्सव आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम मुनिश्र आदित्य सागर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली घासपुरा परिसरात आयोजित केला जाईल. पंच कल्याणक उत्सव हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे ज्यात देवतेच्या पाषाणमूर्तीची प्रतिष्ठापना करत तिची मनोभावनेने पूजा केली जाते.

जेव्हा भक्त दैवी शक्तीचे पालक बनतात

या सोहळ्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे भक्तांना देवमाता होण्याचा बहुमान मिळतो. यासाठी समाजातील सदस्य चिठ्ठी टाकून आणि बोली लावून निवड प्रक्रियेत भाग घेतात. बरेच जण या संधासाठी आपली इच्छा आगाऊ व्यक्त करतात, परंतु अंतिम निर्णय गुरु आणि समाजाच्या परंपरेनुसार घेतला जातो. जैन समाजात देवमाता होण एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. याला आध्यात्मिक साधनेचे प्रतिक मानले जाते. कुणालाही याचा मान मिळत नाही तर त्यासाठी व्यक्तीला अनेक त्याग करावे लागतात, तसेच आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल देखील घडवून आणावे लागतात. यानंतरच तो व्यक्ती या मानासाठी पात्र मानला जातो.

इंद्र दरबार आणि श्रद्धेची आज्ञा

जैन समाजात पंचकल्याण दरम्यान, भगवंताच्या पाच प्रमुख शुभ घटनांचे चित्रण करणारे पाच दिवस पाच विशेष धार्मिक विधी आयोजित केले जातात. या दिवसांंमध्ये इंद्राचा दरबार उभारला जातो, ज्यात इंद्र आणि इंद्राणी बनण्याची संधी दिली जाते. लोक यात आवडीने सहभागी होतात आणि कधीकधी या मानासाठी बोली देखील लावली जाते. ही बोली बऱ्याचदा लाखो रुपयांपर्यंतही पोहचू शकते.

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना का आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?

देवाचे पालक होण्यासाठी भाविकांची रांग

मिळालेल्या वृत्तानुसार, काही लोक या कार्यक्रमातील सेवांसाठी लाखो रुपयांची बोली लावतात, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिकच भव्य बनतो. तथापि, समाजातील सदस्यांचे म्हणणे आहे की, जैनांना समान वागणूक दिली जात असली तरी, ही परंपरा श्रद्धा आणि भक्तीने ओतप्रोत असून ती अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. यात सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लोक स्वत:ला भाग्यशाली मानतात. भाविकांद्वारे पूर्ण श्रद्धेने आणि मनाने यात सहभाग घेतला जातो. देवाचे पालक होण्याची संधी मिळावी म्हणून दूरदूरवरुन लोक या ठिकाणी देऊन भक्तीभावाने सोहळ्यात संमेलित होतात.

Web Title: Unique religious tradition in madhya pradesh devotees participate in special rituals travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • places to visit
  • traditions
  • travel news

संबंधित बातम्या

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
1

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
2

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
3

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
4

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.