बीट हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत
पूर्वीच्या काळी वयाच्या साठी मध्ये महिला आणि पुरुषांचे केस पांढरे होत होते. पण हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. केस पांढरे झाल्यानंतर कोणतीही हेअर स्टाईल केल्यानंतर केस चांगले दिसत नाहीत. तर अनेकदा पांढऱ्या केसांमुळे महिलांना आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. केस पांढरे झाल्यानंतर महिला किंवा मुली बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या शॅम्पू हेअर कलर किंवा हेअर डाईजचा वापर करतात. तर काही मुली पूर्णपणे केसांना रंग लावतात. असे केल्यामुळे काहीकाळ केस सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र कालांतराने केसांच्या गुणवत्तेवर त्याचे चुकीचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी बीटच्या रसात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: त्वचेवर पार्लरसारखी चमक येईल घरीच! १ वाटी दह्याचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा दही फेशिअल
बीट हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत
बीटरूटमध्ये असलेले गुणधर्म त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. बीटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक आढळून येतात, ज्यामुळे केसांची वाढ होऊन केस निरोगी राहतात. बीटमध्ये विटामिन सी, ई आणि कॅरोटीन सारखे अँटीऑक्सिडंट आढळून येतात, ज्यामुळे पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते. विटामिन सी युक्त बीटमध्ये सिलिका असते. यामुळे टाळूवरील केसांचे रक्तभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.
हे देखील वाचा: सतत चष्मा लावून नाकावर काळे डाग आले आहेत? डाग घालवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा