सुंदर त्वचेसाठी 'या' पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर
संपूर्ण शरीर कायमच निरोगी राहण्यसाठी अनेक प्रयत्न केले जातात. शरीरासोबतच त्वचेसुद्धा काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. कारण वातावरणातील बदलांमुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. सुंदर त्वचेसाठी सर्वच महिलांना गुलाब पाण्याचा वापर करतात. गुलाब पाणी त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करते. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे स्किन केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. गुलाबाच्या पाण्याचा थेट वापर केल्यास त्वचेवर चांगले परिणाम दिसून येतात. गुलाबाच्या पाकळ्या वाफवून त्याचे पाणी तयार केले जाते. गुलाबाच्या पाकळ्यांवर प्रक्रिया केल्यानंतर गुलाब पाणी तयार होते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. तसेच मुक्त रॅडिकल्सपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. गुलाब पाणी त्वचेवर लावल्यामुळे सूज, लालसरपणा आणि खाज कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँण्टीइन्फ्लेमेटरी गुणधर्म चेहऱ्यावर वाढलेले डाग कमी करण्यासाठी मदत करतात. गुलाब पाणी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. आज आम्ही तुम्हाला गुलाब पाण्याचे त्वचेला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
धूळ, प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि काळवंडलेली वाटू लागते. त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा झाल्यानंतर पिंपल्स, मुरूम किंवा मोठे मोठे फोड येण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले मुरूम किंवा पिंपल्स लवकर निघून जात नाही. त्यामुळे त्वचेवरील तेल कमी करण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शकता. गुलाब पाण्याच्या वापरामुळे चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी होऊन त्वचा हायड्रेट दिसते. कापसाच्या गोळ्यावर गुलाब पाणी घेऊन चेहऱ्यावर लावल्यास त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होऊन थंडावा मिळेल. गुलाब पाणी चेहऱ्यावर औषधांप्रमाणे काम करते.
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच सतत मोबाइल, लॅपटॉप इत्यादी अनेक गोष्टींचा वापर करतात. यामुळे डोळ्यांखाली काळे डाग किंवा डोळ्यांवर वाढलेल्या तणावामुळे त्वचा अधिकच निस्तेज होऊन जाते. डोळ्यांवर वाढलेल्या तणावामुळे डोळे लाल होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे सतत सुजल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर गुलाब पाणी डोळ्यांमध्ये टाकावे. याशिवाय कापसावर गुलाब पाणी ओतून काहीवेळ डोळ्यांवर ठेवावे. यामुळे डोळ्यांवरील सूज कमी होते.