चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? मग बेसनाच्या पिठात मिक्स करून लावा 'हा' पदार्थ
सुंदर दिसण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी फेसपॅक लावून त्वचा उजळदार केली जाते तर कधी वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट लावून त्वचेची काळजी घेतली जाते. तसेच अनेक महिला त्वचेचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. महागड्या स्किन ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर आणि उजळदार दिसते. मात्र कालातंराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. यामुळे त्वचेवर पिंपल्स येणे, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील अद्र्तेचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्वचा अधिक तेलकट, चिकट होऊन अतिशय खराब दिसू लागते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स, मुरूम किंवा मोठे मोठे फोड येतात. याशिवाय शरीरात वाढलेले पित्त पिंपल्स येण्याचे महत्वपूर्ण कारण आहेत. अतितिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त वाढते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे त्वचा खराब होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी बेसन पिठात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती उपाय त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारून नैसर्गिक चमक वाढवतात.
त्वचा स्वच्छ करण्यासाठी बाजारातील महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर न करता बेसन पिठाचा वापर करावा. यामुळे त्वचेचे सौंदर्य दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहते. शरीर आणि चेहऱ्यावर साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. बेसनाच्या पिठाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास आठवडाभरात त्वचा अतिशय सुंदर आणि गोरीपान दिसेल.
बेसन फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बेसन, कॉफी, भाजलेली हळद, मध, नारळाचे तेल लिंबाचा रस, भिजवलेले तुरटीचे पाणी एकत्र करून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि अंघोळीच्या आधी शरीरावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने त्वचा मसाज करून पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक आठवडाभर नियमित शरीरावर लावल्यास त्वचेवर वाढलेली डेड स्किन कमी होईल आणि त्वचा अतिशय उठावदार, सुंदर दिसेल. टॅनिंग कमी करण्यासाठी बेसन पिठाचा वापर केला जातो.