केसांची खुंटलेली वाढ झपाट्याने होण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याच्या चहाचे सेवन
बदलेले वातावरण, आहारात होणारा बदल, जंक फूडचे अतिसेवन, पोषक घटकांची कमतरता, केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्टचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे केसांच्या वाढीवर गंभीर परिणाम दिसून येतात. केस खराब झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी महिला वेगवेगळ्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण सतत केमिकल प्रॉडक्ट लावल्यामुळे केस आणखीनच रुक्ष आणि कोरडे होऊन जातात. केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस खराब झाल्यानंतर वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट करून केस सुंदर आणि चमकदार केले जातात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी कोणत्याही महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती पदार्थांचे सेवन करून केसांची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य: Pinterest)
अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
केसांमध्ये वाढलेला कोंडा, केस तुटणे किंवा केसांच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. कढीपत्याची पाने केसांसाठी अतिशय गुणकारी ठरतात. केसांच्या मुळांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. यामुळे केसांची वाढ होते. जेवणातील सर्वच पदार्थांमध्ये कढीपत्त्याच्या वापर केला जातो. कढीपत्त्याच्या वापरामुळे पदार्थाची चव आणि सुगंध सुधारतो. कढीपत्त्याची पाने केसांसाठी वरदान मानली जातात. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि बीटा-कॅरोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. केसांची मूळ मजबूत करण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पानांचा चहा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नियमित चहाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
कढीपत्याच्या पानांचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून घ्या. त्यानंतर पाण्यात १० ते १५ कढीपत्त्याची पाने टाकून उकळवा. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. तयार केलेले पाणी गाळून त्यात लिंबाचा रस आणि मध टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या चहाचे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. कढीपत्याचा चहा मंद आचेवर जास्त वेळा उकळवावा. यामुळे पानांमधील अर्क चहामध्ये उतरेल.
कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. यामुळे केस गळणे किंवा केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होते.याशिवाय केस अधिक चमकदार आणि सुंदर दिसतात. लिंबाच्या रसात असलेले विटामिन सी केस पांढरे होण्यापासून रोखतात. केस पांढरे होऊ नये म्हणून लिंबाच्या रसाचे सेवन करावे.