दातांवर साचून राहिलेला किळसवाणा पिवळा थर कमी करण्यासाठी 'या' पदार्थांचा करा वापर
दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, तेलकट तिखट पदार्थ, चिकट पदार्थ इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे दातांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. दातांवर पिवळा थर साचून राहणे, दात लाल दिसणे, दातांच्या हिरड्यांना सूज येणे, दातवर पिवळ्या रंगाचा घाणेरडा चिकट थर साचून राहणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र वारंवार दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे दातांसंबंधित आजार वाढून आरोग्याला हानी पोहचते. बऱ्याचदा दातांचे आरोग्य खराब झाल्यानंतर ते स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रिम्सचा वापर केला जातो. मात्र कोणत्याही चुकीच्या क्रीमचा वापर करणे दातांसाठी आणि संपूर्ण शरीरासाठी घातक ठरू शकते. दात स्वच्छ करण्यासाठी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.(फोटो सौजन्य – iStock)
अपुरी झोप, सतत तंबाखू, गुटख्याचे सेवन, मद्यपान इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. दातांवर पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहिल्यामुळे तोंडातून दुर्गंधीचा घाणेरडा वास येऊ लागतो. या वासामुळे बऱ्याचदा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करून दात स्वच्छ करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.यामुळे तुमचे दात स्वच्छ आणि पांढरेशुभ्र दिसू लागतील.
दातांचे खराब झालेला आरोग्य सुधारण्यासाठी केळ्याच्या सालीचा वापर करावा. यामध्ये असलेले पोषक घटक दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. दातांवर साचून राहिलेले पिवळा थर दूर करण्यासाठी केळ्याची साल घेऊन त्याच्या आतील पांढरा भाग दातांवर व्यवस्थित घासून घ्यावा. त्यानंतर हात किंवा ब्रशच्या सहाय्याने दात घासून स्वच्छ करून घ्या. त्यानंतर पाण्याच्या गुळण्या करा. हा उपाय नियमित केल्यास दातांचे आरोग्य सुधारेल आणि दात स्वच्छ होतील. दातांवर साचून राहिलेला पिवळेपणा सुद्धा काहीसा कमी होऊन जाईल.
हिरड्या किंवा दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा तोंडातून दुर्गंधीचा घाणेरडा वास येऊ लागतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी केळीची साल अतिशय प्रभावी आहे. केळीच्या सालीमुळे तोंडातील बॅक्टरीया नष्ट होतील आणि दात स्वच्छ दिसू लागतील. नैसर्गिकरित्या दात पांढरे आणि स्वच्छ करण्यासाठी केळीची साल गुणकारी आहे.
उन्हाळ्यात ‘या’ मसाल्यांचे सेवन करणे टाळा; चव घ्यायच्या नादात आरोग्य होईल खराब
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडतो. चवीला गोड असलेला पेरू खाल्यानंतर शरीराला विटामिन आणि फायबर मिळते. यासोबतच पेरूची साल सुद्धा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. पेरूच्या सालीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे तोंडात जमा झालेले बॅक्टरीया नष्ट होतील आणि दात स्वच्छ दिसतील. यासाठी टोपात पाणी गरम करून पेरूची पाने उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी गाळून त्यातील पाने बाजूला काढा. पाने दातांवर व्यवस्थित घासून नंतर पाण्याने तोंड स्वच्छ धुवा.