
व्हेज खावे की नॉनव्हेज? दीर्घायुष्यासाठी कोणता आहार आहे सार्वधिक उत्तम, जाणून घ्या सविस्तर
नुकताच ताडदेवमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात प्रॉपर्टी डीलर सांगतोय की, या इमारतीत फक्त व्हेज खाणाऱ्यांसाठी जागा आहे. सध्या यावर उलटसुलट चर्चा चालू झाली आहे. पण शाकाहार चांगला की मांसाहार, हा वाद अनेकदा होताना दिसून येतो. काहींच्या मते शाकाहार हे दीर्घायुष्याचे रहस्य आहे, तर काहींच्या मते मांसातील प्रथिने आणि पोषक तत्वे अधिक फायदेशीर आहेत. पण आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी कोणता आहार खरोखरच चांगला मानला जातो? तज्ज्ञ आणि संशोधनाचा आधार घेऊन या प्रश्नाचा शोध घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की शाकाहारी लोकांना हृदयरोग, उच्च रक्तदाब, टाईप २ मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी असतो. शाकाहारी लोकांचे वजन आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) देखील सामान्यतः कमी असतो, कारण त्यांच्या आहारात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. भाज्या आणि फळांमधील व्हिटॅमिन ई, सी आणि कॅरोटीन शरीराला अंतर्गतरीत्या मजबूत करण्यास मदत करतात आणि कमी सॅचुरेटेड फॅट्समुळे हृदयावरील ताणही कमी होतो.
तर मांसाहाराबद्दल नवनवीन दावे समोर येत आहेत. पूर्वीपासून असा विश्वास होता की शाकाहारी लोक जास्त जगतात, परंतु चीनमधील वृद्ध लोकांवरील एका अलीकडील अभ्यासाने या कल्पनेला आव्हान दिले आहे. या संशोधनानुसार, जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहार घेतात, त्यांचे मांसाहारी लोकांच्या तुलनेत वयाच्या १०० वर्षापर्यंत जगण्याची शक्यता कमी असल्याचे आढळून आले आहे. याचा अर्थ असा की, वृद्धापकाळात शरीराला आवश्यक असलेले पोषण केवळ वनस्पती-आधारित आहारातून पूर्ण होऊ शकत नाही.
यावर एक मधला मार्गही आहे. या अभ्यासातील एक मनोरंजक निष्कर्ष असा होता की, जे लोक मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात, म्हणजेच जे पेस्को-शाकाहारी आहार घेतात, त्यांच्या आयुर्मानात मांसाहारी लोकांच्या तुलनेत लक्षणीय फरक दिसून आला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पूर्णपणे शाकाहारी किंवा पूर्णपणे मांसाहारी असण्यापेक्षा संतुलित आहार अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
आता इतर घटकही यासाठी जबाबदार आहेत. संशोधक असेही म्हणतात की दीर्घायुष्य केवळ खाण्याच्या सवयींवर अवलंबून नसते. आनुवंशिकता, जीवनशैली, शारीरिक हालचाल आणि एकूण आरोग्य यांसारखे अनेक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे, केवळ शाकाहारी किंवा मांसाहारी असण्याने दीर्घायुष्याची किंवा अल्पायुष्याची हमी देता येत नाही.
आरोग्य तज्ज्ञ मांसाहारी लोकांना कमी चरबीयुक्त मांस निवडण्याचा आणि त्यांच्या आहारात वनस्पती-आधारित प्रथिनांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. पौष्टिक गरजा वय, लिंग, शारीरिक हालचालींची पातळी आणि एकूण आरोग्य यानुसार बदलतात, त्यामुळे आहार योजना बनवण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरते.
Ans: दीर्घायुष्यासाठी केवळ व्हेज किंवा नॉनव्हेज असा एकच आहार सर्वोत्तम आहे असे ठामपणे सांगता येत नाही. आहाराची गुणवत्ता, पोषणमूल्य, जीवनशैली आणि एकूण आरोग्य यांचा अधिक महत्त्वाचा वाटा असतो.
Ans: भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, नट्स आणि बिया यांचा समावेश असलेला संतुलित शाकाहारी आहार हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, फक्त शाकाहारी असणे म्हणजे आहार आपोआप आरोग्यदायी असे नाही.
Ans: नाही. अंडी, मासे किंवा मांस यांसारख्या पदार्थांमधून प्रथिने, व्हिटॅमिन B12, लोह आणि इतर पोषक घटक मिळू शकतात. मात्र प्रक्रिया केलेले आणि जास्त प्रमाणात लाल मांस खाणे टाळणे योग्य आहे.