पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? 'या' पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
ओवा खाण्याचे फायदे?
अपचनाच्या समस्या कशामुळे वाढतात?
पचनक्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय?
ओवा हा स्वयंपाकघरातील केवळ एक मसाला नाही, तर आयुर्वेदाचा एक अनमोल खजिना आहे. लोक अनेकदा त्याचा वापर फक्त पोटदुखी, गॅस किंवा आम्लपित्तापासून आराम मिळवण्यासाठी करतात. पण तुम्हाला माहीत आहे का ओवा इतर अनेक गंभीर आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी तितकाच प्रभावी आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही विविध आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. आज आम्ही तुम्हाला ओव्याचे फायदे सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
ओव्यामुळे श्वसन आणि फुफ्फुसांच्या समस्यांपासून आराम मिळतो. ओव्यात थायमोल नावाचे एक संयुग असते, ज्यात जीवाणूनाशक आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. जर तुम्हाला सर्दी, खोकला, नाक चोंदणे किंवा दम्याचा त्रास होत असेल, तर ओव्याचे पाणी किंवा भाजलेल्या ओव्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्ग मोकळा होण्यास खूप मदत होऊ शकते. वाढत्या वयानुसार सांधेदुखी आणि गुडघेदुखी सामान्य आहे. ओव्याचे अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्म सांध्यांची सूज आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. ओव्याच्या तेलाने मालिश केल्याने किंवा त्याचा काढा प्यायल्याने संधिवाताच्या वेदनांपासून आराम मिळतो.
View this post on Instagram
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ओवा नैसर्गिक फॅट बर्नर म्हणून काम करू शकतो. सकाळी रिकाम्या पोटी कोमट ओव्याचे पाणी प्यायल्याने तुमचे मेटाबॉलिझम वाढते, ज्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होण्यास मदत होते आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते. य़ाशिवाय ओव्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या विविध संसर्गांपासून संरक्षण करतात.
शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
महिलांच्या मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळविण्यासाठीही ओवा उपयुक्त आहे. मासिक पाळीच्या काळात पोटाच्या खालच्या भागातील आणि पाठीच्या दुखण्यावर ओवा अत्यंत फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत ओवा घेतल्याने पोटातील पेटके आणि वेदना त्वरित कमी होतात. याशिवाय ओव्याच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी, दातदुखी किंवा सुजलेल्या हिरड्यांपासून त्वरित आराम मिळतो. ओव्याचा योग्य वापर तुम्ही करावा. एक चमचा ओवा १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते उकळून गाळून घ्या. हे कोमट पाणी रिकाम्या पोटी प्या. किंवा, तुम्ही ते भाजून त्यावर चिमूटभर काळे मीठ घालून खाऊ शकता. ओव्याचे हे फायदे आम्ही आयुर्वेदानुसार सांगितले आहेत.
Ans: ओव्याचा वापर पारंपरिक पद्धतीने गॅस, पोट फुगणे आणि अपचनासाठी केला जातो. मात्र, प्रत्येक व्यक्तीला त्याचा परिणाम सारखा होईलच असे नाही.
Ans: ओवा कोमट पाण्यासोबत घेणे किंवा ओव्याचे पाणी करून पिणे हा पारंपरिक उपाय आहे. प्रमाण मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे.
Ans: ओव्यातील काही नैसर्गिक घटक पचनसंस्थेच्या कार्यास मदत करू शकतात. त्यामुळे गॅस आणि पोट फुगण्यासारख्या सौम्य तक्रारींमध्ये काही लोकांना आराम मिळू शकतो.






