(फोटो सौजन्य: Pinterest)
पावसाळ्यात वाढू शकतात मुरुमे
डाॅक्टर मोलिशा सांगतात की, व्हिटॅमिन ई त्वचेच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यास मदत करते. हे एका अँटीऑक्सिडंटप्रमाणे काम करते आणि त्वचेला नैसर्गिकरित्या प्रोटेक्ट करण्यास मदत करते. तथापि, कॅप्सूलमधील तेल हे डायरेक्ट त्वचेवर लावणे चुकीचे आहे. प्रत्येक स्कीन टाईपसाठी याचा डायरेक्ट वापर चांगला ठरत नाही. विशेषत: पावसाळ्यात त्वचा तेलकट झाल्यानंतर आणि यावर पिंपल्सची समस्या जाणवल्यानंतर यावर त्वचेवर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर योग्यपणे करावा.
व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर डायरेक्ट का करु नये?
एक्सपर्टनुसार, व्हिटॅमिन ई कॅप्सूल खाण्यासाठी बनवला जातो. त्यातील तेल हे त्वचेवर लावण्यासाठी असलेल्या उत्पादनाचा पर्याय नाही. दोन्हींचे प्रमाण आणि कंपोजिशन वेगवेगळे आहेत ज्यामुळे कॅप्सूलचा डायरेक्ट चेहऱ्यावर वापर टाळण्य्याचा सल्ला देतो.
व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा चेहऱ्यावर कसा वापर करायचा?
तज्ञांच्या मते, त्वचेवर चमक आणण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे सेवन करणे चुकीचे आहे. यातील पोषक घटक ड्राय फ्रुट्स, बियाणे किंवा हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनातून सहज शरीराला मिळू शकतात. याचबरोबर याचे जास्त सेवन केल्याने त्वचा चमकदार बनते असं मानणं पूर्णपणे चुकीचं आहे.
पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
चेहऱ्यावर आपल्या गरजेनुसार माईल्ड फेसवाॅशचा वापर करा.
तेलकट त्वचा असल्यास माॅईश्चरायझरचा वापर करा.
घामाला आपल्या शरीरावर अधिक काळ टिकून देऊ नका, घाम आला की कापडाने लगेच पुसा.






