चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! या पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम
घरगुती रेटिनॉल क्रिम तयार करण्याची सोपी कृती?
चेहऱ्यावर बारीक रेषा का येतात?
वय वाढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी?
वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, पिंपल्स, मोठे मोठे फोड येऊन त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. वाढत्या वयात त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. चेहऱ्यावर आलेल्या बारीक रेषा, सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीमचा वापर करतात.तर काहीवेळा वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष केल्यास कालांतराने समस्या आणखीनच गंभीर होतात. त्यामुळे वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. त्वचेच्या समस्या वाढण्यामागे केवळ वाढते वय कारणीभूत नसून आहारात होणारे बदल, झोपेची कमतरता, तणाव इत्यादी गोष्टींमुळे सुद्धा त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी केवळ महागड्या क्रीम नाहीतर स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून क्रीम बनवावी. चला तर जाणून घेऊया घरगुती रेटिनॉल क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Health Tips: मेहंदीच्या हाताने जेवणं खरंच धोकादायक? जाणून घ्या यामागचं सत्य
घरगुती क्रीम तयार करण्यासाठी एका ताटात साजूक तूप घेऊन त्यात बर्फाचे खडे घाला. त्यानंतर बर्फाच्या मदतीने साजूक तूप सतत मिक्स करा. साजूक तुपाची घट्टसर पांढरी पेस्ट तयार होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहा. यामुळे तुपातील तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल. तयार केलेल्या मिश्रणातील पाणी पूर्णपणे काढून टाका. त्यानंतर त्यात विटामिन ई कँप्सूल आणि बदाम तेल मिक्स करा. तयार केलेली पेस्ट काचेच्या डब्यात भरून ठेवा. हवाबंद डब्यात क्रीम भरून ठेवल्यामुळे जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहील. तयार केलेली होममेड रेटिनॉल क्रिम १ ते २ आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहते.
तयार केलेली क्रीम रात्री झोपण्याआधी त्वचेवर लावावी. यामुळे त्वचेच्या पेशी सुधारण्यास मदत होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी तूपासून बनवलेल्या क्रीमचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्वचा कोरडी करून संपूर्ण चेहऱ्यावर तयार केलेली क्रीम लावा. क्रीम लावून झाल्यानंतर हलक्या हाताने ५ ते ६ मिनिटं मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. महिनाभर नियमित क्रीमचा वापर केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास होण्यास मदत होते. केवळ स्किन केअर रुटीन नाहीतर पोषक आहार, भरपूर पाणी आणि पुरेशी झोप घेणे सुद्धा फार आवश्यक आहे.
Ans: घरगुती घटकांपासून तयार केलेली क्रीम त्वचेला मॉइश्चरायझ ठेवण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करू शकते. मात्र, बारीक रेषा पूर्णपणे महिनाभरात नाहीशा होतील असा दावा निश्चितपणे करता येत नाही.
Ans: काही घरगुती स्किनकेअर उपायांमध्ये गाजराचा वापर केला जातो. गाजरात बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होते. मात्र, गाजर हे त्वचेवर लावण्यासाठीच्या रेटिनॉलसारखे थेट रेटिनॉइड नाही.
Ans: नवीन घरगुती मिश्रण चेहऱ्यावर रोज लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे. जळजळ, लालसरपणा किंवा खाज जाणवल्यास वापर थांबवा.






