Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या वेळी अचानक जाग येते? लिव्हरसबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय

बऱ्याचदा रात्रीच्या वेळी २ ते ४ मध्ये वारंवार जाग येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. लिव्हरसबंधित आजार, फुफ्फुस किंवा मधुमेह वाढल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी अचानक जाग येते. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2026 | 07:59 AM
रात्रीच्या वेळी अचानक जाग येते? लिव्हरसबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय

रात्रीच्या वेळी अचानक जाग येते? लिव्हरसबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

लिव्हरचे आरोग्य बिघडण्याची कारणे?
रात्रीच्या वेळी अचानक जाग का येते?
शांत झोपेसाठी कोणते उपाय करावेत?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, बिघडलेले मानसिक आरोग्य, जेवणाच्या चुकीच्या वेळा इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी लवकर झोप येत नाही आणि झोप आल्यानंतर सुद्धा अचानक २ ते ३ च्या दरम्यान जाग येते. या समस्येकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण असे न करता शरीरसंबंधित दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. रक्त शुद्ध करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, पित्त तयार करणे इत्यादी ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात.(फोटो सौजन्य – istock)

पांढऱ्या भातातून शरीराला मिळेल विटामिन B-12! उन्हाळ्यात पारंपरिक पद्धतीने बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, पचनक्रिया राहील मजबूत

फॅटी लिव्हर, लिव्हर कॅन्सर, लिव्हर सोरायसिस इत्यादी आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. तसेच रात्रीच्या वेळी केवळ लिव्हरच्या आजारांमुळे नाहीतर इतर समस्यांमुळे सुद्धा उद्भवू शकतो. वैद्यकशास्त्रानुसार, २ ते ३ च्या मध्ये फुफ्फुसांच्या दुरुस्तीशी संबंधित वेळ मानली जाते. रक्तातील साखर कमी होणे, हार्मोन्समधील बदल किंवा लिव्हरवरील ताण इत्यादी कारणांमुळे सुद्धा झोप बिघडण्याची शक्यता असते. झोपेतून अचानक जाग आल्यानंतर खोकला, श्वास घेण्यास त्रास, बेचैनी किंवा सतत एकाच वेळेला जाग येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया रात्रीच्या वेळी अचानक जाग येण्याची कारणे, याबद्दल सविस्तर माहिती.

फुफ्फुसांचे आरोग्य:

फुफ्फुसांचे आरोग्य बिघडल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी अचानक जाग येते. हा वेळ फुफ्फुसांच्या दुरुस्तीसाठी असतो. तसेच झोपेतून उठल्यानंतर खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. कारण फुफ्फुसांमध्ये कफ साचून राहिल्यामुळे विषारी घटक वाढतात आणि आरोग्य बिघडतात. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर सुद्धा फुफ्फुसांसंबधित लक्षणे दिसू लागतात.

रक्तातील साखरेची पातळी कमी होणे:

मध्यरात्रीच्या वेळी अचानक शरीरातील साखरेची पातळी कमी होण्याची जास्त शक्यता असते. ज्यावेळी शरीरातील साखर खूप जास्त कमी होऊन जाते तेव्हा शरीर संरक्षणासाठी कॉर्टिसोल आणि ॲड्रवरनालिन हार्मोन्स स्रवते. हे हार्मोन्स पुन्हा एकदा शरीरात साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. तसेच लिव्हरच्या आरोग्यावर जास्तीचा तणाव निर्माण झाल्यास पहाटे ५ वाजता त्याची लक्षणे दिसू लागतात.

१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता

लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाय:

शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ नये म्हणून जाग आल्यानंतर एका जागेवर शांत बसून ५-१० वेळा ‘ओम’ चा उच्चार किंवा भ्रामरी प्राणायाम करा. यामुळे मज्जासंस्था पुन्हा एकदा शांत झोप घेण्यास सक्रिय होते. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून प्यावी. यामुळे लिव्हर स्वच्छ होण्यास मदत होते आणि विषारी घटक बाहेर पडून जातात. रात्री ९ नंतर मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करणे टाळावे. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये ३ तासांपेक्षा जास्त अंतर असावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हरच्या गंभीर आजारांची सामान्य लक्षणे कोणती असतात?

    Ans: थकवा, भूक न लागणे, पोट फुगणे, त्वचा पिवळी पडणे, मळमळ आणि झोपेच्या समस्या अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: फॅटी लिव्हरमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो का?

    Ans: होय. शरीरातील चयापचय आणि पचन प्रक्रियेवर परिणाम झाल्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते.

  • Que: लिव्हरसाठी घरगुती उपाय कोणते उपयुक्त ठरू शकतात?

    Ans: हळदीचे दूध, कोमट पाणी, आवळा, लिंबूपाणी आणि संतुलित आहार काही प्रमाणात मदत करू शकतात.

Web Title: Waking up suddenly at night these symptoms appear in the body after severe liver related diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 07:59 AM

Topics:  

  • healthy liver
  • liver care
  • sleep problems

संबंधित बातम्या

वेळीच ओळखा लिव्हर कॅन्सरची लक्षणे! लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

वेळीच ओळखा लिव्हर कॅन्सरची लक्षणे! लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Liver Damage: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत; वेळीच व्हा सावध, नाहीतर वाढू शकतो धोका
2

Liver Damage: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत; वेळीच व्हा सावध, नाहीतर वाढू शकतो धोका

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, औषधांसोबतच शरीराला मिळेल पोषण
3

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, औषधांसोबतच शरीराला मिळेल पोषण

झोप न येणे, चिडचिड आणि सतत थकवा? हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर
4

झोप न येणे, चिडचिड आणि सतत थकवा? हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.