Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एन्सेफलायटीस म्हणजे काय? एन्सेफलायटीस झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

एन्सेफलायटीस या मेंदूसंबंधित आजाराची ;लागण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात.विषाणूची लागण झाल्यानंतर मेंदूमध्ये जळजळ होते. जाणून घ्या एन्सेफलायटीस म्हणजे काय? एन्सेफलायटीसची लक्षणे?

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 13, 2025 | 12:35 PM
एन्सेफलायटीस झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

एन्सेफलायटीस झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Follow Us
Follow Us:

चुकीच्या जीवनशैलीचे गंभीर परिणाम आरोग्यावर दिसून येतात. याशिवाय शरीरात वाढलेला मानसिक तणाव मेंदूसंबंधित आजाराचे कारण बनू शकतो. त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी मानसिक आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. जगभरात कोरोना महामारीनंतर अनेक वेगवेगळे विषाणू पसरत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. एन्सेफलायटीस या मेंदूसंबंधित विषाणूमुळे जागतिक आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे सांगत एन्सेफलायटीसवर एक नवीन तांत्रिक अहवाल प्रकाशित केला आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर मेंदूमध्ये जळजळ होते. हा विषाणू सर्व वयोगटातील व्यक्तींना, लहान मुलांना प्रभावित करू शकतो.(फोटो सौजन्य – iStock)

वाढलेले वजन काही दिवसांमध्ये होईल कमी! रोजच्या आहारात ‘या’ पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन, पोटावरील चरबी होईल कमी

2021 मध्ये जागतिक स्तरावर, एन्सेफलायटीस हे 5  वर्षांखालील मुलांमध्ये न्यूरोलॉजिकल आरोग्य बिघाडाचे चौथे प्रमुख कारण होते आणि सर्व वयोगटातील 13 वे कारण होते.आशिया खंडातील भारत, जपान आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये एन्सेफलायटीसचा सार्वधिक प्रसार झाला आहे. दरवर्षी जगभरात सुमारे 1 ते 1.5  दशलक्ष लोक या गंभीर आजाराने ग्रस्त होतात. याशिवाय भारतामध्ये प्रति 100,000  लोकांमागे 16 प्रकरणे आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एन्सेफलायटीस म्हणजे काय? एन्सेफलायटीस झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? यावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले जातात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

एन्सेफलायटीस म्हणजे काय?

एन्सेफलायटीस हा गंभीर न्यूरोलॉजिकल जीवघेणा विषाणू आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर मेंदूमध्ये जळजळ होऊ लागते. याशिवाय या विषाणूची लागण झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते. हा आजार विषाणूजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे किंवा मेंदूवर चुकून हल्ला करणाऱ्या रोगप्रतिकारक पेशींमुळे होण्याची शक्यता असते.एन्सेफलायटीस कारणीभूत असलेले विषाणू डास आणि टिक्स सारख्या कीटकांमुळे पसरू शकतात.

एन्सेफलायटीस झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

  • डोकेदुखी
  • ताप
  • स्नायू किंवा सांधेदुखी
  • स्नायू कमकुवतपणा
  • थकवा किंवा अशक्तपणा
  • ताठ मान
  • शरीराच्या अनियमित हालचाली
  • बोलण्यात किंवा ऐकण्यात अडचण
  • संवेदना कमी होणे
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, पोट होईल स्लिम

एन्सेफलायटीसवर उपचार:

एन्सेफलायटीससारख्या गंभीर आजाराची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. ज्यामुळे या धोकादयक आजारापासून शरीराचे नुकसान होणार नाही. अँटीव्हायरल औषधे, स्टिरॉइड इंजेक्शन्स, इम्युनोग्लोबुलिन थेरपी, प्लाझ्माफेरेसिस, ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया, अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे इत्यादी उपचार करून हा आजार बरा केला जातो. मात्र एन्सेफलायटीस या आजाराची लागण झाल्यानंतर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: What is encephalitis symptoms and preventive measures explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • brain
  • Health Care Tips
  • WHO

संबंधित बातम्या

Pomogranate Benefits: सकाळी उठल्यानंतर नियमित करा वाटीभर डाळिंबाचे सेवन, रक्त शुद्ध होण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स
1

Pomogranate Benefits: सकाळी उठल्यानंतर नियमित करा वाटीभर डाळिंबाचे सेवन, रक्त शुद्ध होण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स

Health Update: रक्ताच्या एका थेंबामधून समजणार आता दोन आजार! दुर्गम भागांतही कमी खर्चात निदान आता शक्य
2

Health Update: रक्ताच्या एका थेंबामधून समजणार आता दोन आजार! दुर्गम भागांतही कमी खर्चात निदान आता शक्य

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून
3

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय
4

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.