वजन कमी करताना कोणत्या वेळी पपई खावी:
वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. वाढलेले वजन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो.शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष देखील सोशल मीडियासह इतर ठिकाणी वजन कमी करण्याचे डाएट, व्यायाम इत्यादी अनेक गोष्टी शोधल्या जातात. शरीरात वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास देखील कमी होऊन जातो. वजन वाढण्यामागे अनेक कारण आहेत. खराब जीवनशैली, आहारात होणारे, कामाचा तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पपईचे सेवन करावे. पपईमध्ये असलेले विटामिन सी त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात. वजन कमी करताना तुम्ही पपईचे सेवन करू शकता. याशिवाय पपई खाल्यामुळे शरीराला इतरही अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात पपई फळ खाल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पपई खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? पपईचे कधी आणि किती प्रमाणात सेवन करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यसाठी पपईचे सेवन करावे. पपई खाल्यामुळे पोटावर वाढलेला अतिरिक्त चरबीचा घेर कमी होतो आणि पोट स्लिम राहते. पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. तसेच पपई खाल्यामुळॆ लवकर भूक लागत नाही. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास पपईचे सेवन करावे. कारण यामध्ये असलेली नैसर्गिक साखर शरीरासाठी प्रभावी ठरते. यामध्ये असलेले पपेन एन्झाइम पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.
पपई साखळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खावी. उपाशी पोटी खाल्लेल्या पदार्थांमुळे शरीर सुधारते. शरीरातील डिटॉक्स प्रक्रिया सुरळीत होते आणि फॅट बर्निंग वेगाने वाढत जाते. तसेच दुपारच्या जेवणाआधी पपई खाल्यास पचनक्रिया निरोगी राहते. पण पपईचे जास्त सेवन केल्यास पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. संध्याकाळच्या नाश्त्यात देखील पपईचे सेवन करावे. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि पचनक्रिया सुधारते.सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही पपई स्मूदी बनवून पिऊ शकता.
पपईमध्ये असलेला नैसर्गिक गोडवा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी आणि विटामिन ई असल्याने त्वचेची चमक वाढते. पपई खाल्यामुळे शरीराचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाचे कार्य बिघडते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी पपई खावी.