हिप इपिंगमेंट म्हणजे नक्की काय
हिप इंपिंगमेंट किंवा फेमोरोएसिटॅब्युलर इंपिंगमेंट (एफएआय) हे तेव्हा घडते जेव्हा हिपच्या जॉइंटला हालचाली दरम्यान मांडीचे हाड (फेमर) आणि ओटीपोटाचे एकमेकांसोबत घर्षण होते. अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीला त्रासदायक वेदना होतात आणि हालचालींवर मर्यादा येतात. ही स्थिती केवळ खेळाडूंमध्येच नाही तर सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येते. ही स्थिती हळूहळू विकसित होते आणि उपचारास विलंब केल्यास गंभीर रुप धारण करु शकते.
ही स्थिती एखाद्याच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करते आणि दैनंदिन कामे सहजतेने करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. जीवनशैलीसंबंधीत घटक देखील या स्थितीत कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, सॉकर सारख्या खेळात वारंवार होणाऱ्या हालचालींमुळे सांध्याच्या कूर्च्यास दुखापत होते, सतत बसून राहण्याच्या सवयीमुळे नितंबाच्या सभोवतालचे स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे असुरक्षितता वाढते. ही स्थिती हिपच्या ऑस्टियोआर्थरायटिसचे सुरुवातीचे लक्षण मानले जाते. विशेषतः 45 वर्षाखालील लोकांमध्ये ही समस्या पहायला मिळते. डॉ आशिष अरबट, ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
कारणे कोणती
हिप इंपिंगमेंटमुळे हालचालींवर मर्यादा येते. ही स्थिती शारीरिक विभिन्नतेमुळे दिसून येते ज्यामध्ये फेमोरल हेड किंवा एसिटाबुलमचा असामान्य आकार, ज्यामुळे हालचाली दरम्यान अडचणी उद्भवतात. आनुवंशिकता, ठराविक खेळ ज्यामुळे सांध्यावर ताण येतो. शिवाय, स्नायूंची बळकटी आणि लवचिकता यातील असंतुलन हिप जॉइंटवर अतिरिक्त ताण निर्माण करु शकते ज्यामुळे संरचनात्मक समस्यांमध्ये वाढ होऊन ही स्थिती उद्भवू शकते.
काय आहेत लक्षणे

काय आहे हिप इंपिंगमेंटची लक्षणे
हालचाल करताना क्लिक किंवा पॉपिंगची संवेदना होणे, विशेषत: स्क्वॅटिंग किंवा पाय दुमडून बसणे यासारख्या क्रियांमध्ये व्यस्त असताना, कोणतीही क्रियाकलाप करताना अस्वस्थता, चालताना नितंबासंबंधीत वेदना, नितंब आणि कंबरेतील सांध्यांमधील ताठरता, पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे आणि वाकणे अशक्य होते.
निदान कसे होते
तुमचा वैद्यकीय इतिहास पाहून शारीरिक तपासणी केली जाते. नितंबांच्या सांध्याची तपशीलवार रचना तपासण्यासाठी तुम्हाला एक्स-रे, एमआरआय किंवा सीटी स्कॅन करण्यास सांगितले जाईल. निदानाची पुष्टी झाल्यानंतर उपचारांचे अनुकरण केले जाते.
हेदेखील वाचा – काय आहे एव्हीएन अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस? यामुळे सांधेदुखीची होईल गंभीर समस्या
काय आहेत उपचार

कोणत्या उपचारांनी बरे होऊ शकते






