ओपन मॅरेज म्हणजे काय
सध्या अनेकदा ओपन मॅरेज हा शब्द कानावर येत असतो. आधुनिक काळात ओपन मॅरेजचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे, पूर्वी हा उच्च समाज किंवा अतिश्रीमंत लोकांपुरता मर्यादित होता, परंतु आजकाल मध्यमवर्गीय जोडपी देखील त्याचे अनुसरण करताना दिसत आहेत.
विवाहचे बंधन हे आजही आपल्या समाजात पवित्र मानले जाते. भारतीय समाजात ओपन मॅरेजचा काय अर्थ आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इतकंच नाही तर ओपन मॅरेजमुळे नक्की काय धोके निर्माण होतात आणि त्याचा आयुष्यावर आणि नातेसंबंधावर काय परिणाम होतो याबाबत वकील अजित भिडे यांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत (फोटो सौजन्य – iStock)

ओपन मॅरेजची संकल्पना
Open Marriage हा एकपत्नीत्व नसण्याचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एकतर व्यक्तीचे विवाहबाह्य किंवा रोमँटिक संबंध असू शकतात आणि यासाठी विवाहित जोडपे एकमेकांशी सहमत असतात. याला कोणत्याही प्रकारची नात्यातील फसवणूक मानली जात नाही. हे संबंध दुसऱ्या व्यक्तीशी पत्नी वा पती असतानाही परस्पर समंजसपणानुसार ठेवले जातात.
यामध्ये जोडप्यातील कोणत्याही व्यक्तीला कोणतीही अडचण असू शकत नाही. म्हणजे नवऱ्याच्या आयुष्यात पत्नीशिवाय गर्लफ्रेंड असू शकते, तर दुसरीकडे बायकोलादेखील नवऱ्याशिवाय बॉयफ्रेंड असू शकतो. अशा परिस्थितीत घराबाहेरही कोणत्याही अडथळ्याशिवाय या जोडप्याचे प्रेमसंबंध सुरू राहू शकतात. दरम्यान याचे 5 सर्वाधिक मोठे दुष्परिणाम काय आहेत जाणून घेऊया.
या प्रकारचे नाते कितीही रोमांचक वाटले तरी, आपण या नात्यात भावनिक गुंतणार तर नाही ना याची नेहमी भीती असते. तसंच याबाबत सत्य बाहेर येण्याची भीती अनेक वेळा समाजात निर्माण होते. व्यक्ती यामुळे सतत चिंतेत राहाते जे मानसिक आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
हेदेखील वाचा – प्रेमविवाह असूनही का तुटते नाते, तज्ज्ञांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही विचार कराल

भांडणांची शक्यता
जरी विवाहित जोडप्यांनी एकमेकांना विवाहबाह्य संबंध ठेवण्याची परवानगी दिली तरीही काही वेळा तुम्हाला हेवा वाटू शकतो, ज्यामुळे असुरक्षितता निर्माण होते अथवा आत्मसन्मान नसल्याचा भाव निर्माण होतो आणि अनिश्चितता येते. कधी कधी अती ईर्ष्यामुळे हातून गुन्हाही घडू शकतो अथवा नात्यात तेढ निर्माण होऊ शकते.
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पर्याय असेल तर आणि तुमचे एकापेक्षा अधिक व्यक्तींसह लैंगिक संबंध असतील तर एड्स, सिफिलीस आणि गोनोरिया यांसारख्या लैंगिक संक्रमित रोगांचा धोका असतो. याशिवाय, संसर्ग तुमच्या पती किंवा पत्नीमध्ये देखील पसरू शकतो, ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
हेदेखील वाचा – नाते घट्ट करण्यासाठी ‘या’ खास टिप्स तुमच्यासाठी…
लग्नाव्यतिरिक्त, जर तुमचा जोडीदार असेल तर त्यांच्यासोबतचे नाते टिकवण्यासाठी खर्च अधिक प्रमाणात होतो. याचा अर्थ तुम्ही सामान्य विवाहापेक्षा ओपन मॅरेजमध्ये अधिक खर्च कराल. यामध्ये डेटिंग, भेटवस्तू, वाहतूक आणि सुट्ट्यांचा खर्च समाविष्ट आहे. याचा तुमच्या खिशावर अधिक भार पडू शकतो
ओपन मॅरेजचे रहस्य तुमच्या मुलांसमोर उलगडले तर तुम्हाला एक वेगळाच पेच सहन करावा लागेल, पण मुलांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.यामुळे पालक म्हणून कदाचित मुलं अनादर करू शकतात आणि तुमच्याशी वाईटदेखील वागू शकतात.






