
Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन... इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट
पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन
भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक
भारताच्या पूर्वेतील रेल्वे लाईनवर सर्वात शेवटचे रेल्वे स्थानक म्हणजे सिंहाबाद. हे रेल्वे स्थानक मालदा जिल्ह्यातील हबीबपुर ब्लाॅकमध्ये स्थित आहे. हे रेल्वे स्थानक बांग्लादेशच्या सीमेजवळ वसले आहे. या स्थानकाच्या पलीकडून बांग्लादेशाची वाट सुरु होते. या भाैगोलिक खासियतमुळेच नाही तर ऐतिहासिक कारणामुळेही हे रेल्वे स्थानक खास मानले जाते. ब्रिटिश शासन काळात वापरण्यात आलेले गेअर आणि बॅरियर आजही या रेल्वे स्थानकावर पाहायला मिळतात. तथापि, येथील तिकिट काऊंटर बंद करण्यात आले आहेत.
एकही प्रवासी गाडी थांबत नाही
या स्थानकावरील सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे इथे एकही पॅसेंजर ट्रेन थांबत नाही. फाळणीनंतर इथे प्रवासी रेल्वे हळूहळू बंद करण्यात आली. आज इथले प्लॅटफाॅर्म पूर्णपणे ओसाड आणि निर्जन बनले आहे. इथून फक्त मालगाडी जाते, ज्यामुळे इथे फार मोजके कर्मचारी कामासाठी नेमण्यात येतात.
बांग्लादेशाचे रेल्वे स्थानक आहे जोडलेले…
सिंदबादच्या पलीकडे बांगलादेशातील रोहनपूर हे रेल्वे स्थानक वसले आहे. भाैगोलिकदृष्ट्या हे भारताच्या पूर्वेकडील असे रेल्वे स्थानक आहे जे सीमेपलिकडील शेजारच्या देशाच्या रेल्वेमार्गांना जोडले जातात. परंतु भारतीय रेल्वे सेवा या स्थानकावरच संपते. याच कारणांमुळे भारताचे हे रेल्वे स्थानक व्यावसायिकदृष्ट्या नाही तर भू-राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.