योगासने केल्यानंतर किती वेळाने अंघोळ करावी?
निरोगी आरोग्यासाठी व्यायाम किंवा योगासने करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायाम किंवा आसन केल्यामुळे शरीराची स्नायू लवचिक होतात आणि वेदनांपासून आराम मिळतो. तसेच यामुळे शरीराला ऊब मिळते. शरीरामधील ऊर्जेत वाढ होऊन शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी व्यायाम, योगासने करावीत. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर व्यायाम आणि योगासने करतात आणि लगेच नाश्ता करतात. पण असे केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. योगासने केल्यानंतर लगेच पाणी सुद्धा पिऊ नये. तसेच अंघोळ करण्याबाबत सुद्धा हाच सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला व्यायाम किंवा योगासने केल्यानंतर किती वेळाने अंघोळ करावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी योगासने, व्यायाम केल्यानंतर 30 मिनिटांनी अंघोळ कारवी. व्यायाम आणि योगासने केल्यानंतर लगेच अंघोळ करून नये.
योगासने केल्यानंतर शरीरात ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचा परिणाम अंघोळीवर होतो. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. योगा किंवा व्यायाम केल्यामुळे शरीराचे तापमान वाढते किंवा थंड राहते. पण लगेच आंघोळ केल्यामुळे शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
योगासने केल्यानंतर लगेच आंघोळ केल्यामुळे वायू, पित्त, कफ यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शिवाय याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. सतत तापमानात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
योगासने किंवा व्यायाम करण्यापूर्वी आंघोळ केल्यामुळे शरीरात निर्माण झालेला थकवा कमी होतो. शिवाय आरोग्यसुद्धा अनेक फायदे होतात. तसेच अंतर्गत ऊर्जा आणि लक्ष केंद्रित होते. अंघोळ केल्यामुळे शरीराची एकाग्रता वाढते आणि ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे योगासने केल्यानंतर 30 मिनिटांनी आंघोळ करावी. लगेच आंघोळ करू नये.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि शरीर संतुलन राखण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे. आंघोळ न केल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित आंघोळ करावी. नियमित आंघोळ न केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच आंघोळ केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.