भारतीय जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. कांद्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. काहींना जेवणासोबत कच्चा कांदा खायला खूप जास्त आवडतो तर काहींना जेवणातील प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा लागतो. पण चवीने खाल्ला जाणारा कांदा काहींच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. यामध्ये असलेले घटक शरीरात विषासमान घटक तयार करतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी कांद्याचे सेवन अजिबात करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
'या' व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

विशिष्ट आजारांनी त्रास असलेल्या लोकांनी आहारात कांद्याचे सेवन करू नये. इरिटेबल बोवेल सिंड्रोमसारख्या गंभीर त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांनी कच्चा कांदा अजिबात खाऊ नये.

कांद्यामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्स पोट फुगणे, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण करतात. तसेच ज्यांना वारंवार अपचन किंवा ऍसिडिटी होत असेल अशांनी कांदा अजिबात खाऊ नये.

कच्या कांद्याचे सेवन केल्यामुळे पोटातील ऍसिडचे प्रमाण वाढते आणि छातीमध्ये जळजळ, पोटात जळजळ इत्यादो समस्या वाढतात. कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात.

तुमच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास कांद्याचे अजिबात सेवन करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने कांदा खावा. कांदा न खाल्ल्यास रक्तस्त्राव रोखण्यास मदत होते.

रक्त पातळ करण्याची औषध घेत असलेल्या व्यक्तींनी कांदा बेताने खावा. कांद्यामुळे औषधांच्या परिणामात अडथळा निर्माण होऊ शकतात.






