रक्तभिसरण सुधारण्यासाठी नियमित करा ही योगासने
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीराचे रक्तभिसरण सुरळीत होणे आवश्यक आहे. रक्तभिसरण सुरळीत असेल तर आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत, अन्यथा आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. रक्तभिसरण शरीरातील अवयवांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी मदत करते. तसेच कार्बन डायऑक्साइड आणि शरीरातील इतर विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. पण जर शरीरातील रक्तभिसरण बिघडले तर थकवा, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घ्यावे. तसेच नियमित सकाळी उठल्यानंतर योगासने केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला शरीराचे बिघडलेले रक्तभिसरण सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. ही योगासने नियमित केल्यास रक्तभिसरण सुधारेल.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हे आसन नियमित केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. शरीराचे रक्तभिसरण सुधारून आरोग्यासंबंधित समस्या कमी होण्यास मदत होईल. हे योगासन करताना हात आणि पाय सरळ करा आणि लांब त्रिकोण तयार करा. असे केल्यामुळे डोक्याचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. हे आसन सकाळी उठल्यानंतर नियमित करावे. यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतील आणि रक्तभिसरण सुधारेल.
त्रिकोणासन ही एक मुद्रा असून नियमित केल्यास स्नायू मजबूत होऊन शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. हे आसन नियमित केल्यास हृदय आणि फुफ्फुसाचा विस्तार होण्यास मदत होईल.
संतुलन आणि स्थिरतेसाठी वृक्षासन करण्याचा सल्ला दिला जातो. हे आसन पायांच्या स्नायूंसोबतच शरीराचे स्नायूसुद्धा निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. हे वृक्षांसन नियमित केल्यास डोक्यासोबतच संपूर्ण शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल.
ताडासन करताना शरीराचे स्नायू ताणले जातात, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. ताडासन केल्यामुळे शरीराचे संतुलन सुधारते शिवाय स्नायू आणि शिरा मध्ये रक्तभिसरण वाढण्यास मदत होते. हे आसन सकाळी किंवा इतर वेळी नियमित केल्यास शरीराचे रक्तभिसरण सुधारून आरोग्याला कोणतीही हानी पोहचणार नाही. शिवाय शरीरातील थकवा कमी होऊन शरीराला ऊर्जा मिळेल.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सकाळी उठल्यानंतर अनेक लोक योगासने किंवा व्यायाम करण्यास आळस करतात. पण असे केल्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटं योगासने करावीत. यामुळे शरीराचे बिघडलेले रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. व्यायाम किंवा योगासने केल्यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो आणि शरीराचे स्नायू लवचिक होतात. हाडांमध्ये होणाऱ्या वेदना, सतत होणारी डोकेदुखी, थकवा कमी होऊन शरीराला फायदे होतात.