डासांच्या केमिकल अगरबत्तीचा बाळांवर परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
डासांसाठी पोषक काळ अर्थात पावसाळा सुरू होताच अनेक भारतीय घरांमध्ये डास प्रतिबंधक अगरबत्तींचा वापर आता नेहमीचेच झाले आहे. हर्बल किंवा नैसर्गिक उपाय म्हणून बाजारात आणलेली ही उत्पादने प्रामुख्याने हिरव्या किंवा पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये विकली जातात, ज्यात सिट्रोनेला किंवा कोरफडी सारख्या घटकांचा वापर केल्याचा दावा केला जातो. तथापि, यापैकी निरुपद्रवी वाटणाऱ्या अनेक डास प्रतिबंधक अगरबत्ती फायद्यापेक्षा नुकसानच जास्त करण्याची शक्यता आहे, विशेषतः लहान मुलांचे. डॉक्टर पवन मांडवीय, बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशू तज्ज्ञ याबाबत अधिक माहिती देत आहेत.
तुमच्या घरातील नजरेआडचा धोका
जर तुमचे मूल सतत खोकला, सर्दीने वारंवार आजारी पडत असेल किंवा ताप नसतानाही चिडचिड करत असेल तर तुम्ही वेगळा विचार करणे गरजेचे आहे. व्हायरल संसर्गाच्या पलीकडे जात वातावरणातील बदल आणि घरातीलच एखाद्या कारणाचा विचार करू शकता. विचारांती तुम्हाला अनपेक्षित असलेले कारण समोर येईल, ते म्हणजे बेकायदेशीर आणि बनावट डास प्रतिबंधक अगरबत्ती.
या अगरबत्त्या लोकप्रिय असल्या तरी त्यांना सरकारची मान्यता नाही. म्हणजेच, सरकारी मान्यतेसाठी आवश्यक ते सुरक्षा मानक आणि परिणामकारकतेचे निकष त्यांनी पूर्ण केलेले नाहीत. शिवाय त्यात नियमबाह्य किंवा मान्यता नसलेली रसायने आहेत. ते कोणत्याही प्रक्रियेचे पालन करत नाहीत, मग ते मान्यताप्राप्त रसायनांचा वापर करणे असो किंवा सुरक्षा नियमांचे पालन करणे असो. हे पदार्थ जाळल्यानंतर झालेला धूर हा श्वासावाटे आत गेल्यास श्वसनमार्गासाठी त्रासदायक ठरू शकतो. तसेच मुलांच्या फुफ्फुसांवर परिणाम करू शकतो.
डास काही विशिष्ट रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनाच का चावतात?; काय आहे कारण
दिशाभूल करणारी लेबल्स?
लेबल्सवरील हर्बल घटकाच्या उल्लेखाने फसू नका. फक्त ‘सिट्रोनेला’ किंवा कोरफड आहे असे म्हणणे म्हणजे उत्पादन सुरक्षित आहे याची खात्री नाही. असा शब्दांचा खेळ करत अनेकदा हानिकारक कृत्रिम घटक लपवत नैसर्गिक सुरक्षिततेची खोटी भावना निर्माण केली जाते. त्याचे पॅकेजिंग हिरवे आणि आकर्षक असले तरी ते आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक नाहीत
हे लक्षात ठेवा
केवळ सरकारी मान्यता असलेल्या रिपेलंट्स निवडा: सीआयआर क्रमांकाकडे लक्ष द्या. मच्छर प्रतिबंधक निवडताना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीद्वारे (सीआयबीआरसी) मंजूर केलेले कायदेशीर आणि सुरक्षित उपायच नेहमी निवडा.
पॅकेजिंगवर नेहमीच सीआयआर नोंदणी क्रमांक तपासा. ज्याप्रमाणे आपण हेल्मेट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा औषधांसाठी आयएसआय किंवा बीआयएस प्रमाणपत्रावर अवलंबून असतो, त्याचप्रमाणे संबंधित उत्पादनाची चाचणी सरकारी अधिकाऱ्यांनी केली असून ती मंजूर देखील केली आहे, हे सीआयआर क्रमांक सांगतो. गुडनाइट सारखे सर्व विश्वासार्ह आणि सरकार मान्यताप्राप्त ब्रँड त्यांच्या लिक्विड व्हेपोरायझर्सच्या पॅकवर हा सीआयआर क्रमांक प्रकाशित करतात. परिणामकारकता आणि सुरक्षितता या दोन्हीचा हा महत्त्वाचा निकष आहे.
World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
उत्पादन वापराबाबतच्या सूचना आणि इशारे काळजीपूर्वक वाचा
मान्यताप्राप्त रिपेलेंट्सवरील इशारा लेबल्सबाबत काही पालक प्रश्न उपस्थित करतात. परंतु कोणत्याही रासायनिक-आधारित उत्पादनासाठी ही नेहमीचीच पद्धती आहे. लेबल्स म्हणजे काही धोकादायक नाही तर ती जबाबदारीने वापरण्यासाठीची सूचना आहे, हे समजून घ्या. स्वच्छता उत्पादने, औषधे किंवा स्वयंपाकघरातील जंतुनाशकांवरही तुम्हाला हे इशारे आढळतील.
जागरूक पालक बना
मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार हा आजही गंभीर धोका आहे. डास प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहेच पण ते योग्यरित्या करणे देखील आवश्यक आहे. केवळ सरकारी मान्यताप्राप्त रिपेलेंट्स वापरून आणि बेकायदेशीर अगरबत्ती सारख्या उत्पादनांपासून अंतर ठेवून तुम्ही तुमच्या मुलाला केवळ संसर्गजन्य आजारांपासूनच वाचवत नाही तर विषारी पदार्थांपासून देखील त्यांचे रक्षण करता. यामुळेच डास प्रतिबंधकाची निवड सूज्ञपणे करा, कारण तुमच्या मुलाच्या आरोग्याचा विचार असतो तेव्हा प्रत्येक श्वास महत्त्वाचा असतो. रात्रभर डासांपासून संरक्षण व्हावे यासाठी, विशेषतः मुलांसाठी लिक्विड व्हेपोरायझर्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोणते उत्पादन आणि केव्हा वापरायचे हे जाणून घेतल्यानंतर दुष्परिणामांची चिंता न करता कुटुंब सुरक्षित राहते.