डास चावल्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे जगात दरवर्षी करोडो लोकांचा मृत्यू होतो. काही देशांमध्ये, मच्छरजन्य रोगांमुळे होणारे मृत्यू हे तेथील मृत्यूचे मुख्य कारण आहे. त्यामुळे लोक डासांना दूर करण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? जगात एक असा देश आहे जिथे तुम्ही डास मारू शकत नाही! तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा कोणता देश आहे जिथे तुम्ही डास मारू शकत नाही आणि यामागचे कारण काय ? चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
या देशात तुम्ही साधा एक मच्छरही नाही मारू शकत! पण का असे?
या देशाचे नाव आहे देश आइसलँड! इथे तुम्ही डास मारू शकत नाही कारण इथे डास आहेतच नाहीत. साहजिकच जेव्हा डास असतील नाहीतर त्यांना कसे मारणार. उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला आइसलँड हा असा देश आहे जिथे एकही डास नाही
खरं तर, डासांशिवाय, या देशात इतर फारसे प्राणी नाहीत, जे साधारणपणे जगाच्या कानाकोपऱ्यात सहज दिसतात. आइसलँडमध्ये प्राण्यांच्या अंदाजे 1300 प्रजाती आहेत. याशिवाय येथे मानवी लोकसंख्याही खूपच कमी आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आइसलँडच्या शेजारील ग्रीनलँड, स्कॉटलंड आणि डेन्मार्क इत्यादी देशांमध्ये डासांची संख्या मुबलक प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत, आइसलँडमध्ये डास का नाहीत?
डासांबाबत असे मानले जाते की ते साचलेल्या उथळ पाण्यात वाढतात. जिथे त्यांची अंडी अळ्यांमध्ये बदलतात. यासाठी त्यांना योग्य तापमान देखील आवश्यक आहे. आइसलँडमधील परिस्थिती अशी आहे की साचलेले पाणी जास्त काळ टिकत नाही. तसेच कमी लोकसंख्येमुळे घरांमध्ये डासांसाठी परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे येथे डासांची पैदास होऊ शकत नाही
असेही म्हणता येईल की आइसलँडमध्ये तापमान खूप कमी आहे. येथे तापमान अगदी -38 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. अशा परिस्थितीत येथे डासांची पैदास करणे किंवा राहणे अशक्य आहे. तथापि येथे एक मच्छरसारखा दिसणारा प्राणी आहे मात्र तो मच्छर नाही
केवळ डासच नाही तर आइसलँडमध्ये सापासारखे इतर सरपटणारे प्राणी किंवा कीटक नाहीत. येथील हवामान आणि तापमानही या प्राण्यांसाठी योग्य नाही. त्यामुळे यासारखे अनेक प्राणी आइसलँडमध्ये अस्तित्वात नाहीत