फोटो सौजन्य - Social Media
डासांनी प्रत्येकाच्या आरामाची वाट लावून टाकली आहे. दिवसाची सोडा तर रात्रीचीही झोप उडवून टाकली आहे. ठिकठिकाणी डेंग्यू मलेरियासारखे आजार थिअमन घालत आहेत. डासांनी त्यांचे उग्ररूप घेतले आहे. संध्याकाळ झाली कि लोकांच्या घरामध्ये हमला बोलतात. लोकांच्या घरात घुसून त्यांना नकोसे करतात. जर तुम्ही या त्रासाशी झुंज देत आहात तर तुम्ही एकटे नाही आहात. आम्हीही तुमच्या सोबतीला आहोत. कारण या त्रासाने संपूर्ण देश हैराण आहे. पण याला एक उपाय आहे. हे उपाय केल्याने डास तुमच्या घराच्या भोवती फिरकणार सुद्धा नाहीत. फक्त एक काम करा आणि डासांच्या त्रासापासून मुक्ती मिळवा.
जर तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना डासांच्या त्रासापासून लांब ठेवायचे आहे. तर हाच तो उपाय आहे, जो तुमच्या त्रासला लांब ठेवू शकतो. तुम्हाला डेंग्यू मलेरिआपासून लांब ठेऊ शकतोय. तर नक्की हे उपाय आजमवा. सर्वप्रथम एक तुळशीचे रोपटे घ्या. या रोपट्याला एक तर घराच्या दाराशी लावा, अन्यथा खिडकीशी लावा. याचा आपल्याला फार मोठा फायदा होईल. या रोपट्याचा सुगंध डासांना फार लांब ठेवतो. त्यामुळे याला प्रवेशाच्या ठिकाणी, जेथून वात घराच्या आत येत असते अशा ठिकाणी ठेवणे फार उपयोगी ठरते. डासांच्या चावल्यावरही तुळशी फायद्याची ठरते. आपल्या घराच्या अवतीभवती तुळशी लावल्याने फार मोठा फायदा होत असतो.
तुळशीचे रोपटे घराबाहेर लावल्याने अनेक फायदे असतात. घरामध्ये सकारात्मकता वाढते. नकारत्मकतेचा नाश होत जातो. ताण आणि चिंता कमी होत जातो. तुळशीचे रोपटे आरोग्यसाठी तसेच मानसिक आरोग्यसाठी फार महत्वाचे मानले जाते. भारतात या रोपट्याला फार मोठे स्थान आहे. घरोघरी तुळशीची पूजा केली जाते. आ रोपट्याचा अनेक फायद्यांमुळे याला देशात दैवी स्थान आहे. तुळशीच्या पानांत असलेले रसायन डासांना दूर ठेवण्यास मदत करते आणि शिवाय तुळशीचे आरोग्य फायदेही भरपूर आहेत.
डासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे नीमाची पाने. नीमाच्या पानांमध्ये डासांना दूर ठेवणारे गुणधर्म असतात. घराच्या दरवाजे आणि खिडक्यांवर नीमाची पाने ठेवल्यास डास दूर राहतात. याशिवाय, लॅव्हेंडर तेलही एक प्रभावी उपाय आहे. लॅव्हेंडर तेलाचा वास डासांना आवडत नाही, त्यामुळे घराच्या भोवतालच्या ठिकाणी हे तेल स्प्रे केल्याने डास लांब ठेवता येतात. किटॉन तेल सुद्धा याचसाठी वापरता येते. हे तेल घराच्या दारांवर लावल्यास डास दूर राहण्यास मदत होते. डासांचा त्रास कमी करण्यासाठी आणि घर सुरक्षित ठेवण्यासाठी हे पर्यावरणपूरक उपाय परिणामकारक आहेत. अशा साध्या उपायांनी घरातील डासांचा त्रास कमी करणे शक्य होते, ज्यामुळे संपूर्ण घराची शांती अबाधित राहते.
तुळशी, नीम आणि लॅव्हेंडर यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास केवळ डासच नाहीत तर अन्य कीटकांचा त्रासही कमी करता येतो. हे उपाय पर्यावरणपूरक असल्याने आरोग्यासाठी सुरक्षित असून, हानिकारक रसायनांपासून बचाव करणारे आहेत. यामुळे घरातील सर्व सदस्यांना सुरक्षिततेची खात्री मिळते.