फोटो सौजन्य: iStock
दरवर्षी जागतिक मच्छर 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे डासांपासून होणाऱ्या घातक आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या नियंत्रणासाटी प्रभावी उपाययोजना राबवणे हा आहे. डास हे जगभरातील सर्वात धोकादायक किटक मानले जातात. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, झिका व्हायरस आणि चिकनगुनिया यांसारखे आजार होतात. जे अनेकदा जीवघेणे देखील ठरतात. पण तुम्हाला माहित आहे का की, काही लोकांना इतरांपेक्षा डास जास्त चावतात. ज्यामुळे ते डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांना बळी पडतात. पण याचे एक विशिष्ट कारण शास्त्रज्ञांनी ओळखले आहे. आज आपण याचे कारण जाणून घेणार आहोत.
कोणते रक्तगट असणारे व्यक्तींना डास चावतात?
A+, B+, AB+, O हे रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रमाणात डास चावतात. कारण म्हणजे ज्यांना सेक्रेटर्स म्हणून ओळखले जाते, त्यांच्या शरीरातील द्रवांमध्ये हे प्रतिजन असतात जसे अश्रू किंवा लाळ. उदाहरणार्थ, रक्त गट बी असलेली व्यक्ती बी प्रकारचा सेक्रेटर असेल. रक्तगट O असलेले लोक H प्रतिजन असेल, तर या व्यकतींना डास चावतात.
डास चावणे आणि रक्तगटाचा संबंध काय?
अनेक दशकांपासून संशोधक आणि शास्त्रज्ञ डासांचे वर्तन आणि नमुने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संशोधनात असे आढळून आले आहे की, सर्वसाधारपणे डास इतर रक्तगटाच्या तुलनेत O रक्तगट असणाऱ्या लोकांना चावतात. या मागाचे कारण म्हणजे या रक्तगटात नॉन-स्क्रेटर्सपेक्षा जास्त स्क्रेटर्स आढळतात.
या गोष्टीही तुम्हाला मच्छर चुंबक बनवतात?