Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहाप्रेमींनो, सकाळचा चहा ठरतोय अ‍ॅसिडिटीचा ‘ट्रिगर’! जाणून घ्या यामागचं खरं कारण

Drinking Tea Causes Acidity: चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि पोटाच्या समस्या जाणवतात, ज्यामागे चहातील काही घटक आणि चुकीच्या वेळेला चहा पिण्याची सवय यामुळे काही लोकांना चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि पोटाच्या समस्या जाणवतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 10, 2026 | 04:57 PM
चहाप्रेमींनो, सकाळचा चहा ठरतोय अ‍ॅसिडिटीचा ‘ट्रिगर’! जाणून घ्या यामागचं खरं कारण
Follow Us
Follow Us:
  • चहा प्यायल्याने होते अॅसिडिटी?
  • यामागचं खरं कारण काय?
  • अॅसिडिटी टाळण्यासाठी काय करावे?
भारतात चहा हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळची सुरुवात असो, ऑफिसमधील ब्रेक असो किंवा मित्रांसोबतच्या गप्पा, चहाशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. मात्र काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच अॅसिडिटी, छातीत जळजळ, पोट फुगणे किंवा आंबट ढेकरांचा त्रास सुरू होतो. त्यामुळे ‘चहा पिताच अॅसिडिटी का होते?’ हा प्रश्न अनेकांना पडतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामधील काही घटक आणि चुकीच्या वेळेला घेतलेला चहा पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. परंतु, यामागचे खरे कारण कोणते, जाणून घेऊयात.

Health Tips: जिरे, ओवा की मेथीचं पाणी? आरोग्यासाठी कोणता पर्याय ठरतो सर्वाधिक फायदेशीर

चहामुळे अॅसिडिटी का वाढते?

तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन्स हे घटक असतात. हे घटक पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढवतात. विशेषतः रिकाम्या पोटी चहा घेतल्यास पोटाच्या आतील थरावर परिणाम होतो आणि अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. तसेच जास्त वेळ उकळलेला चहा शरीरासाठी अधिक हानिकारक मानला जातो. त्यामध्ये टॅनिन्सचे प्रमाण वाढल्याने गॅस आणि जळजळ होण्याची शक्यता अधिक असते.

कोणत्या लोकांनी अधिक काळजी घ्यावी?

ज्यांना आधीपासून अॅसिडिटी, गॅस्ट्रिक अल्सर किंवा अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांनी चहाचे सेवन मर्यादित ठेवावे. दिवसातून अनेक वेळा चहा पिण्याची सवयीमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. तसेच जास्त साखर, मसाले किंवा रिकाम्या पोटी घेतलेला चहा अधिक त्रासदायक ठरतो.

अॅसिडिटी टाळण्यासाठी काय करावे?

  • रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा.
  • दिवसातून २ ते ३ कपांपेक्षा जास्त चहा घेऊ नका.
  • चहा जास्त वेळ उकळू नका.
  • चहासोबत हलका नाश्ता घ्या.
  • पुरेसे पाणी प्या आणि नियमित व्यायाम करा.

घरगुती उपायही ठरू शकतात फायदेशीर

अॅसिडिटीचा त्रास वारंवार होत असल्यास काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. जेवणानंतर कोमट पाणी पिणे, बडीशेप किंवा गुळवेलसारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करणे पचन सुधारण्यास मदत करू शकते. तसेच रात्री उशिरा चहा पिणे टाळणे आणि झोपण्यापूर्वी हलका आहार घेणेही महत्त्वाचे मानले जाते. योग्य जीवनशैलीमुळे पोटाच्या समस्या नियंत्रणात राहू शकतात. तज्ज्ञांच्या मते, चहा पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र योग्य प्रमाण आणि योग्य वेळ पाळल्यास अॅसिडिटीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: लॅपटॉपवर काम करून शरीर पोखरतंय? Work From Home करणाऱ्यांमध्ये वाढतोय ‘या’ आजारांचा धोका

Web Title: Why tea causes acidity heartburn gas and digestive problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy tea
  • tea side effects

संबंधित बातम्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
1

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
2

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका
3

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व
4

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.