फोटो सौजन्य: iStock
हिवाळा आला की अनेक जण आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसतात. त्यातही हा ऋतू अनेक आजराना आमंत्रण देणारा असतो. त्यातही जर तुम्हाला हृदयासंबंधित समस्या असतील तर हिवाळ्यात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाणही या ऋतूत वाढते. कारण थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. याव्यतिरिक्त, संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यासाठी आणि उष्णता राखण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम करावे लागतात. यामुळे, छातीत दुखणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा हात आणि खांद्यामध्ये अस्वस्थता ही हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. हे ओळखणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून योग्य वेळी योग्य खबदारदारी उचलता येतील.
हार्ट अटॅक एखाद्याच्या वयानुसार येत नाही. हार्ट अटॅकची समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीला येऊ शकते. तरीही विशिष्ट प्रकारच्या लोकांना याचा जास्त धोका असतो.
वय: साधारणपणे, 45 वर्षांवरील पुरुष आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो.
कौटुंबिक इतिहास: जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला हार्ट अटॅक किंवा हृदयविकार झाला असेल, तर तुम्हालाही जास्त धोका असू शकतो.
खराब जीवनशैली: धूम्रपान, मद्यपान, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
हे Grey Divorce आहे तरी काय, 50 व्या वर्षातही जोडप्यांमध्ये का वाढत आहे याचे प्रमाण
इतर रोग: उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या आजारांमुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो.
हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवणे थोडे कठीण असले तरी ते अशक्य नाही आहे. या ऋतूत हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढू शकतो, परंतु जर तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवला तर त्यांच्या सल्ल्याने हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो. चला जाणून घेऊया अशाच 5 प्रभावी टिप्सबद्दल.
फिजिकली अॅक्टिव्ह राहा: हिवाळ्यात अनेकदा लोक थोडे आळशी होतात, त्यामुळे हृदयाची कार्यक्षमताही कमी होऊ लागते. म्हणूनच आपण रोज व्यायाम केला पाहिजे आणि खेळातही सहभागी होत राहिले पाहिजे.
आरोग्यदायी आहार: आपल्या आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. संतुलित आहार शरीराचे योग्य तापमान राखतो, ज्यामुळे आपल्या हृदयाला जास्त मेहनत करावी लागत नाही.
अति थंडी टाळा: ज्यांना आधीच हृदयविकार आहे त्यांनी जास्त वेळ थंडीत बाहेर राहणे टाळावे आणि शक्यतो घरातच राहावे.
थंडीत उबदार कपडे घाला: बाहेर जाताना आरामदायक आणि उबदार कपडे घालणे खूप महत्वाचे आहे. थंडीत शरीर चांगले झाकणे व शरीर थंड होऊ न देणे देखील महत्त्वाचे आहे.
दारूचे सेवन टाळा: जास्त मद्यपान केल्याने शरीराचे तापमान बदलण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हृदयावर दबाव येऊ शकतो. म्हणूनच हिवाळ्यात दारूचे जास्त सेवन टाळावे.