Upasana Kamineni Konidela: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर नेहमीच स्पष्टपणे आपली भूमिका मांडणाऱ्या उपासना कामिनेनी कोनिडेला यांनी पुन्हा एकदा महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. यावेळी त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा पुरुषांना खूश करण्यासाठी दुसऱ्या महिलांना कमी लेखणाऱ्या महिलांना खडे बोल सुनावले आहेत. एका महिलेचं दुःख ही दुसऱ्या महिलेची विजयाची संधी असू शकत नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. Upasana Kamineni Konidela:
नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपासना यांनी सांगितले की, महिलांनी एकमेकींना खऱ्या अर्थाने साथ देणे, त्यांच्या यशाचा आनंद साजरा करणे आणि एकमेकींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, यापेक्षा सशक्त करणारी दुसरी गोष्ट नाही.
त्या म्हणाल्या, “आज अनेक महिलांना आपल्या मदतीची आणि पाठिंब्याची गरज आहे. मात्र, माझ्या संशोधनातून हेही समोर आले आहे की, अनेक महिला स्वतःच्या यशासाठी दुसऱ्या महिलांना पायदळी तुडवतात.
अशा महिलांना माझा इशारा आहे की, स्वतःच्या यशासाठी किंवा एखाद्या कमकुवत पुरुषाला खूश करण्यासाठी दुसऱ्या महिलेला खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका. आज अनेक मुलांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कारण काही महिलांनी स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्या महिलांवर अन्याय केला आहे.”
View this post on Instagram
पुढे त्या म्हणाल्या, “एका महिलेचं दुःख ही दुसऱ्या महिलेची विजयाची संधी असू शकत नाही. आपण सर्वांनी एकत्र पुढे जायला हवं आणि एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. यासाठी आपली विचारसरणी बदलणं गरजेचं आहे. माझा यावर ठाम विश्वास आहे आणि माझ्या संशोधनातूनही मला हीच शिकवण मिळाली आहे. आज अशा महिलांसोबत असल्याचा मला आनंद आहे, ज्या कोणत्याही स्वार्थाशिवाय इतर महिलांना सक्षम बनवतात आणि ज्यांचं मन मोठं आहे. मी स्वतःला अशाच लोकांच्या सहवासात ठेवते. तसेच, ज्यांनी इतरांवर अन्याय केला आहे, त्यांनाही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि सावरण्याची संधी देते.”
दुसऱ्या महिलांना खाली खेचणाऱ्या महिलांविरोधात उपासना यांनी मांडलेली भूमिका हा एक महत्त्वाचा संदेश आहे. खरी ताकद दुसऱ्यांना खाली खेचण्यात नसून, एकमेकींना हात देऊन पुढे नेण्यात आहे, हेच त्यांनी आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केले.
Ans: महिलांनी एकमेकींना साथ द्यावी, एकमेकींच्या यशाचा आनंद साजरा करावा आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Ans: स्वतःच्या फायद्यासाठी किंवा पुरुषांना खूश करण्यासाठी दुसऱ्या महिलांना कमी लेखणाऱ्या महिलांवर त्यांनी टीका केली.
Ans: एका महिलेचे दुःख ही दुसऱ्या महिलेच्या विजयाची संधी असू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.






