Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2025: भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे सोशल मीडियावर सर्वाधिक Trending; वर्षभर प्रवाशांचं मन जिंकणारा अनुभव

Most Visited Places 2025 : 2026 च्या आगमनापूर्वी 2025 च्या प्रवासाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या वर्षी प्रवाशांनी गर्दीपासून दूर असलेल्या, शांत, नैसर्गिक आणि सांस्कृतिक अनुभव देणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 27, 2025 | 10:07 AM
Year Ender 2025 This year five places in India were the most trending and popular on social media

Year Ender 2025 This year five places in India were the most trending and popular on social media

Follow Us
Close
Follow Us:
  1. २०२५ मध्ये भारतीय प्रवाशांनी शांत, अनुभवात्मक, निसर्गप्रधान आणि आध्यात्मिक स्थळांना प्राधान्य दिले.
  2. काश्मीर, राजस्थान, प्रयागराज-वाराणसी, वृंदावन-गोवर्धन आणि मेघालय ही पाच ठिकाणे सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंडिंग राहिली.
  3. इंस्टाग्राम रील्स, प्रवास व्लॉग्स आणि सेलिब्रिटी व्हिजिट्समुळे या ठिकाणांची लोकप्रियता झपाट्याने वाढली.
Most Visited Places 2025 : २०२५ वर्ष संपत आलं आहे आणि २०२६ चे स्वागत करण्याआधी भारतीय प्रवाशांनी या वर्षी अनुभवलेली असंख्य प्रवासस्थळे पुन्हा एकदा ट्रेंडिंग यादीत झळकू लागली आहेत. भारतीय पर्यटनासाठी (Indian Tourism) हे वर्ष खरोखरच खास ठरले. गेल्या वर्षभर भारतातील प्रवाशांनी गर्दीपासून दूर, शांत, निसर्गप्रधान आणि सांस्कृतिक अनुभव देणाऱ्या ठिकाणांचा शोध घेतला. इंस्टाग्राम रील्स, व्ह्लॉग्स, जेन-झेडचा एस्थेटिक प्रवास आणि मिलेनियल्सचा सजग पर्यटनाचा कल यांनी भारतातील पर्यटन ट्रेंडला वेगळी दिशा दिली. या सर्वांमुळे भारतातील काही विशिष्ट ठिकाणे वर्षभर सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहिली.

काश्मीर

या ट्रेंडिंग ठिकाणांमध्ये सर्वात वर काश्मीरचे नाव चमकले. २०२५ मध्ये काश्मीरने पुन्हा सिद्ध केले की ते ‘धरतीचा स्वर्ग’ का मानले जाते. बर्फाच्छादित दऱ्या, ट्यूलिप गार्डनचे रंग, शांत निसर्ग आणि कमी गर्दी असलेली दऱ्या, या सर्वांनी काश्मीरचा जादू वाढवला. सोनमर्ग, अरु व्हॅली, द्रास आणि गुरेझ व्हॅली या ठिकाणी तरुण आणि एकल प्रवाशांनी विशेष रित्या गर्दी केली. पहलगाम हल्ल्याचा पर्यटनावर अल्प परिणाम पाहायला मिळाला, परंतु सोशल मीडियावर काश्मीरच्या मनमोहक दृश्यांनी पुन्हा स्वतंत्रच धुमाकूळ घातला.

राजस्थान

दुसरे मोठे ट्रेंडिंग स्थळ म्हणजे राजस्थान. परंतु हा राजस्थान आपल्या ओळखीचा भव्य किल्ल्यांचा नव्हता, तर ग्रामीण राजस्थान होता. खिमसर, ओसियार, बारमेर आणि जैसलमेरजवळील वाळवंटी गावांतील तंबू-स्टे आणि ग्रामीण अनुभवांनी प्रवाशांना एक वेगळा, शांत आणि प्रामाणिक वाळवंटाचा अनुभव दिला. इंस्टाग्रामवर या डेझर्ट-कॅम्पच्या फोटोशूट्स आणि रील्स व्हायरल झाल्याने ग्रामीण राजस्थान वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : कधीही होऊ शकते युद्ध! Durand Lineवर हालचालींना वेग; पाकिस्तानची आता खैर नाही, सूडाच्या आगीत पटले ‘हे’ देश

प्रयागराज आणि वाराणसी

तिसरे ट्रेंडिंग ठिकाण म्हणजे प्रयागराज आणि वाराणसी. २०२५ मधील महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजवर संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रीत झाले. लाखो भाविकांनी येथे आगमन केले, ज्यामुळे हे शहर सतत बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सतेज राहिले. कुम्भानंतर प्रवाशांची गती वाराणसीकडे वळली. वाराणसीचे घाट, गंगा आरती, काशी कॉरिडॉरचे रात्रीचे अलौकिक दृश्य, गल्लीबोळातील संस्कृती आणि स्ट्रीट फूड या सर्वांनी वाराणसीला २०२५ मधील सर्वाधिक व्हायरल आध्यात्मिक डेस्टिनेशन बनवले.

So Bengal is now India’s No. 2 magnet for foreign tourists Ahead of Gujarat and even Rajasthan! Can’t understand how and why?
Clearly the world has fallen for mishti doi, Durga Puja and Tagore more than we imagine. Can anyone explain?
Source: India Tourism Data Compendium 2025 pic.twitter.com/rW8J39NkOj — Harsh Goenka (@hvgoenka) November 26, 2025

credit : social media

वृंदावन आणि गोवर्धन

वृंदावन आणि गोवर्धन यांनी यावर्षी आध्यात्मिक पर्यटनाची विशेष लोकप्रियता मिळवली. प्रेमानंद जी महाराजांच्या आश्रमात अनेक प्रमुख सेलिब्रिटींच्या भेटींमुळे या ठिकाणांचा सोशल मीडियावरील पोहोच प्रचंड वाढला. गोवर्धन परिक्रमा, ब्रज यात्रा, यमुना आरती यांचे रील्स सतत ट्रेंडिंगमध्ये राहिले. तरुणांचे एकले प्रवास, कुटुंबांचे धार्मिक टूर आणि भक्तिमय रील्स यामुळे वृंदावन-गोवर्धन २०२५ मधील सर्वाधिक पाहिले गेलेले आध्यात्मिक केंद्र ठरले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Guinea-Bissau : आता ‘या’ देशातही निवडणुकीनंतर अवघ्या तीनच दिवसात झाले सत्तापालट; सीमा केल्या बंद अन् राष्ट्रपती बेपत्ता

मेघालय

ईशान्य भारतानेही प्रवास प्रेमींना जोरदार आकर्षित केले, विशेषतः मेघालयने. चेरापुंजी, डावकी, मावलिनॉन्ग आणि क्रांग सूरीच्या निळ्या धबधब्यांनी त्यांच्या अप्रतिम सौंदर्याने देश-विदेशातील प्रवाशांना आकर्षित केले. ढगांनी आच्छादलेली दऱ्या, स्वच्छ नद्या, कॅम्पिंगचे शांत अनुभव आणि अलौकिक दृश्यांनी मेघालयला २०२५ मधील सर्वाधिक “इंस्टाग्रामेबल” ठिकाण बनवले. एकूणच, २०२५ हे वर्ष भारताच्या पर्यटनासाठी संस्मरणीय ठरले. शांतता, सौंदर्य, आध्यात्मिकता, स्थानिक संस्कृती आणि सोशल मीडियाने या पाच ठिकाणांना वर्षातील सर्वाधिक ट्रेंडिंग डेस्टिनेशन्स बनवले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: २०२५ मध्ये भारतातील सर्वाधिक ट्रेंडिंग पर्यटन स्थळ कोणते?

    Ans: २०२५ मध्ये काश्मीर हे भारतातील सर्वाधिक ट्रेंडिंग पर्यटन स्थळ ठरले.

  • Que: २०२५ मध्ये आध्यात्मिक पर्यटनात कोणते ठिकाण सर्वाधिक लोकप्रिय राहिले?

    Ans: वाराणसी, वृंदावन आणि गोवर्धन ही ठिकाणे सर्वाधिक लोकप्रिय ठरली.

  • Que: सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहिलेले ईशान्य भारतातील ठिकाण कोणते?

    Ans: मेघालय हे २०२५ मध्ये ईशान्य भारतातील सर्वाधिक ट्रेंडिंग राज्य राहिले.

Web Title: Year ender 2025 this year five places in india were the most trending and popular on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • kashmir
  • Meghalaya
  • travel news

संबंधित बातम्या

एकाच ट्रिपमध्ये दोन देश फिरून होतील, तेही परवडणाऱ्या किमतीत… फक्त फॉलो करा हे ट्रॅव्हल हॅक
1

एकाच ट्रिपमध्ये दोन देश फिरून होतील, तेही परवडणाऱ्या किमतीत… फक्त फॉलो करा हे ट्रॅव्हल हॅक

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे
2

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस
3

एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस

International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव
4

International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.