Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्यांग व्यक्तीशी लग्न केल्यास १ लाखाचे अर्थसहाय्य; तब्बल ‘इतक्या’ जणांनी घेतला योजनेचा लाभ

दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास त्यांच्या संसारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १ लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. गेल्या ५ वर्षांत या योजनेचा शहरातील ६३ जोडप्यांनी लाभ घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2022 | 03:14 PM
दिव्यांग व्यक्तीशी लग्न केल्यास १ लाखाचे अर्थसहाय्य; तब्बल ‘इतक्या’ जणांनी घेतला योजनेचा लाभ
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास त्यांच्या संसारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १ लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. गेल्या ५ वर्षांत या योजनेचा शहरातील ६३ जोडप्यांनी लाभ घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. याचबरोबर शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग कक्षामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा शहरातील दिव्यांग बांधवांना मोठा आधार होत असून जीवन सुकर होण्यासाठी लाभ होत आहे.

दिव्यांग व्यक्तींना समाजात वावरता अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाण असल्यास अशा दिव्यांगाशी अव्यंग व्यक्तीने विवाह केल्यास त्यांना पालिकेतर्फे प्रोत्साहन म्हणून एक लाख रूपये देण्यात येतात. ही योजना महापालिकेने २०१८ पासून सुरू केली असून, आत्तापर्यंत ६३ जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

२०१८ ला ही योजना सुरू करण्यात आली असली तरी पहिल्या वर्षी एकाही जोडप्याने या योजनेचा लाभ घेतला नाही. त्यानंतर २०१९-२० मध्ये २०२०-२१ मध्ये २०, २०२१-२२ मध्ये १९ तर २०२०-२३ मध्ये जुलै अखेर ४ अशा ६३ जणांना ६३ लाख रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी दरवर्षी २० लाखांची तरतूद करण्यात येते.

[read_also content=”गणेश विसर्जनासाठी पालिकेची उपाययोजना https://www.navarashtra.com/maharashtra/municipal-measures-for-ganesh-immersion-nrdm-322634.html”]

“दिव्यांग व्यक्तींना दररोजच्या आयुष्यात जगताना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांग व्यक्तींप्रती समाजाचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने दिव्यांग व्यक्तीशी अव्यंग व्यक्तीने विवाह केल्यास त्यांच्या संसाराला हातभार म्हणून पालिका १ लाखांची मदत करते. यामधून त्या जोडप्याला जगण्याची नवी उमेद मिळावी, हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे”, असे समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.

Web Title: 1 lakh financial assistance if married to a disabled person almost so many people took the benefit of the scheme nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2022 | 03:14 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Pimpri
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी
2

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान
3

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी
4

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.