Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today:‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तटकरे-पटेल यांच्यासोबत बैठक’

Maharashtra Breaking News: मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची स्वतंत्र बैठक झाल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर जयंत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत ‘तटकरे आणि पटेल यांच्यासोबत माझी बैठक झाली नाही’ असं म्हटलं आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 15, 2026 | 10:53 AM
LIVE
Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Follow Us
Follow Us:
  • 15 Jul 2026 10:53 AM (IST)

    15 Jul 2026 10:53 AM (IST)

    कॅगचा मोठा खुलासा! राज्यातील अनेक हॉस्टेल्समध्ये उघड लुट

    देशाच्या शिक्षण व्यवस्थेबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे संपूर्ण व्यवस्थाच संशयाच्या भोवऱ्यात उभी राहिली आहे. हा खळबळजनक खुलासा महाराष्ट्रातील ‘घोस्ट हॉस्टेल्स’ (अस्तित्वात नसलेली किंवा भूताटकी हॉस्टेल्स) शी संबंधित आहे. ज्या हॉस्टेल्समध्ये वर्षानुवर्षे चिटपाखरूही फिरकत नव्हते, त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा सरकारी निधी लाटला जात होता. या मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश कॅगच्या (CAG – नियंत्रक आणि महालेखापरीक्षक) ताज्या अहवालात झाला असून, प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या या उघड लुटीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

  • 15 Jul 2026 10:43 AM (IST)

    15 Jul 2026 10:43 AM (IST)

    “तुकाराम मुंढेंकडे शिक्षण खातंही सोपवा”, मराठी अभिनेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन

    राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. बनावट, निकृष्ट आणि नियमबाह्य अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे त्यांच्या कामकाजाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहे. मुंढे यांनी केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण राज्यभरात आता तुकाराम मुंढे पॅटर्नची चर्चे रंगली आहे. त्यांच्या या धडक कारवाईमुळे याआधी काहीच काम होत नव्हतं का असा सवाल सर्वसामान्यंकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

  • 15 Jul 2026 10:33 AM (IST)

    15 Jul 2026 10:33 AM (IST)

    ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांच्या अडचणींत होणार वाढ; शिवसेनेने थेट खासदारांना…

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरणाचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला आता कायदेशीर व घटनात्मक वळण लागले आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी १३ जुलै रोजी संजय दिना पाटील यांच्यासह सहा बंडखोर खासदारांना पत्र पाठवत त्यांच्या विलीनीकरणाच्या दाव्यावर आक्षेप नोंदवला आहे. केवळ काही खासदारांनी दावा केल्याने पक्षाचे विलीनीकरण वैध ठरत नसल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

  • 15 Jul 2026 10:23 AM (IST)

    15 Jul 2026 10:23 AM (IST)

    2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा; मिलिंद देवरांचा रोख कुणाकडे?

    “येत्या 2029 सालाच्या निवडणुकीत नक्कीच बदल होणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांना आपण रिटायर करायचं आहे,” अशा अप्रत्यक्ष शब्दांत शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा रोख ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.

  • 15 Jul 2026 10:13 AM (IST)

    15 Jul 2026 10:13 AM (IST)

    मुंबई हादरली! पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटरवर पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केला खून

    मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आहे. ओशिवरा पोलीस स्टेशनच्या अवघ्या १०० मीटर अंतरावरील सिग्नलवर एका पतीने आपल्या पत्नीची दगडाने गळा ठेचून निर्घृण हत्या केली. थेट पोलीस स्टेशनच्या शेजारीच हा प्रकार घडल्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

  • 15 Jul 2026 10:03 AM (IST)

    15 Jul 2026 10:03 AM (IST)

    ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तटकरे-पटेल यांच्यासोबत बैठक’? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांही रंगल्या होत्या. अशातच या भेटीसंदर्भात आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

    सुत्रांच्या हवाल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या तीनही नेत्यांनी जवळपास सव्वा तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची स्वतंत्र बैठक झाल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर जयंत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत ‘तटकरे आणि पटेल यांच्यासोबत माझी बैठक झाली नाही’ असं म्हटलं आहे.

  • 15 Jul 2026 09:30 AM (IST)

    15 Jul 2026 09:30 AM (IST)

    Mumbai Goa Highway Accident: डंपरला कारची मागून जोरदार धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

    Mumbai Goa Highway Accident  : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज, बुधवारी (१५ जुलै) सकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघाताची घटना घडली आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने समोरील डंपरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पार चक्काचूर झाला असून, कारमधील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा घटनास्थळीच जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

    मृतांमध्ये दोन महिला व एका बालकाचा समावेश

    पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील मृत व्यक्ती गोव्याकडून मुंबईकडे प्रवासासाठी निघाल्या होत्या. महामार्गावरील माणगाव नजीक कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा (बालकाचा) समावेश आहे. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, कारमधील प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांना मोठी शर्थ करावी लागली.

  • 15 Jul 2026 09:25 AM (IST)

    15 Jul 2026 09:25 AM (IST)

    Kashedi Ghat Landslide:  मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

    Kashedi Ghat Landslide:   मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्कतेची बातमी समोर येत आहे. महामार्गावरील पोलादपूर जवळील अत्यंत आव्हानात्मक आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या कशेडी घाटात धामणदिवी गावाच्या हद्दीत अचानक मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे महामार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

    कोकणातून मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कशेडी घाटातील धामणदिवी गावाजवळ डोंगराचा एक मोठा भाग खचून थेट मुख्य रस्त्यावर आला. ही दरड कोकणाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर कोसळल्यामुळे या वाहिनीवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्त्यावर आलेले मोठे दगड, झाडे आणि मातीचा प्रचंड ढिगारा यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक प्रशासनाकडून तत्काळ थांबवण्यात आली आहे.

  • 15 Jul 2026 09:20 AM (IST)

    15 Jul 2026 09:20 AM (IST)

    Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदी स्थिर!

    Gold Rate Today: भारतात 15 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,279 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,089 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,709 रुपये आहे. भारतात 15 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,42,790 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,090 रुपये आहे. भारतात 15 जुलै रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 234.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,34,900 रुपये आहे.

  • 15 Jul 2026 09:15 AM (IST)

    15 Jul 2026 09:15 AM (IST)

    Milind Deora News: 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा

    Mumbai Politics: “येत्या 2029 सालाच्या निवडणुकीत नक्कीच बदल होणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांना आपण रिटायर करायचं आहे,” अशा अप्रत्यक्ष शब्दांत शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा रोख ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.

    ‘2029 मध्ये नक्कीच बदल होणार’

    कार्यक्रमात बोलताना मिलिंद देवरा म्हणाले की, “आज येथे जमलेली गर्दी पाहून 2029 मध्ये नक्कीच बदल होणार, असा विश्वास वाटतो. बदल म्हणजे वरळीचा आमदार बदलणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे सर्वसामान्य वरळीकरांना फायदा होईल,” असा विश्वास व्यक्त केला.

  • 15 Jul 2026 09:10 AM (IST)

    15 Jul 2026 09:10 AM (IST)

    Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीची संथ सुरुवात? आज या शेअर्सवर ठेवा विशेष लक्ष

    India Share Market Update: भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज १५ जुलै रोजी बुधवारी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी सावध राहावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात संथ असल्याचे दर्शवतात. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ८ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,०३२ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

  • 15 Jul 2026 09:07 AM (IST)

    15 Jul 2026 09:07 AM (IST)

    Rain Update : देशातील ‘या’ 13 राज्यांसाठी पुढील 8 तास महत्त्वाचे

    नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल दिसून येत आहे. काही ठिकाणी पावसाने अद्याप ओढ दिली आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता देशातील 13 राज्यांमध्ये पुढील 8 तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील 7 दिवसांत पूर्व आणि ईशान्य भारत, पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.  वाचा सविस्तर- 

     

  • 15 Jul 2026 09:05 AM (IST)

    15 Jul 2026 09:05 AM (IST)

    छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; पटना हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

    पटना: पटना उच्च न्यायालयाच्या एका वादग्रस्त निरीक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिलेची सलवार काढण्याचा प्रयत्न करणे किंवा तिची छाती दाबणे याला ‘बलात्काराचा प्रयत्न’ म्हणता येणार नाही, असे पटना उच्च न्यायालयाने नुकतेच निरीक्षण नोंदवले होते. या निर्णयाची देशभरात चर्चा सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायाधीशांनी महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत अधिक संवेदनशीलता, कायदेशीर अभ्यास आणि संशोधन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत.

Maharashtra to National And International Breaking News:  

Jayant Patil On Fadnavis Meeting:   राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांही रंगल्या होत्या. अशातच या भेटीसंदर्भात आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

सुत्रांच्या हवाल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या तीनही नेत्यांनी जवळपास सव्वा तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची स्वतंत्र बैठक झाल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर जयंत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत ‘तटकरे आणि पटेल यांच्यासोबत माझी बैठक झाली नाही’ असं म्हटलं आहे.

 

 

Web Title: 15 july 2026 live breaking news marathi maharashtra politics national international maharashtra monsoon alert supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:१४ राज्यांमध्ये वादळी पावसासह ‘हाय अलर्ट’; ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहणार
1

Maharashtra Breaking News Updates Today:१४ राज्यांमध्ये वादळी पावसासह ‘हाय अलर्ट’; ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.