(फोटो सौजन्य: Pinterest)
मृत व्यक्तीची ओळख चंदन कुमार अशी झाली आहे. त्याचे वय २२ वर्ष होते आणि तो एक रिक्षाचालक होता. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, सकाळी जवळपास ११ वाजेच्या सुमारास चंदन घरातून बाहेर पडला. सुरुवातीला कुटुंबाला वाटले की, तो नेहमीप्रमाणे कामावर जात आहे. पण नंतर त्यांच्या लक्षात आले की, त्याने रिक्षाची चावी तर घरीच ठेवली होती. बराच काळानंतरही घरी न परतल्याने कुटुंबाला चंदनची काळजी वाटू लागली. रात्रीपर्यंत जेव्हा तो घरी परतला नाही तेव्हा त्यांनी विचार केला की, तो त्याच्या कोणत्या तरी मित्राघरी थांबला असावा. बुधवारी जेव्हा रेल्वे ट्रॅकवर तीन भागांत वाटलेले शरीराचे तुकडे मिळाले तेव्हा त्याची ओळख चंदन कुमार झाली. शरीराचे तुकडे करुन असे खुलेआम फेकण्यावरुनच आपण आरोपीच्या क्रुर वृत्तीचा अंदाज लावू शकतो. दरम्यान चंदनचे शरीर तर भेटले पण त्याचे शीर अजूनही बेपत्ता आहे.
मित्रावर शंका
पोलिसांच्या तपासात, चंदनच्या मित्रावर संशय घेतला जात आहे कारण त्याला शेवटचा काॅल कौशल नगर येथे राहणाऱ्या त्याच्या मित्राने केला होता. मित्राचे नाव छोटू असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. छोटूच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले असता चाैकशीदरम्यान तिने पती छोटूनेच चंदनला मारल्याचे कबूल केले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पोलिस अनेक ठिकाणी छापे देखील टाकत आहे. या घटनेमुळे संतापलेल्या स्थानिक लोकांनी गुरुवारी अनिसाबाद-फुलवारी मुख्य रस्ता अडवला आणि पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पोलिसांनी चंदनचे शीर लवकरात लवकर ताब्यात घ्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी त्यांची समजूत काढत ही नाकेबंदी हटवली. सध्या या परिसरात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आला आहे.
Pune Crime: पुण्यात RTE प्रवेशात मोठा भ्रष्टाचार? मोफत शिक्षणासाठी 50 हजार ते अडीच लाखांची मागणी
माहितीनुसार, पोलिस श्वानांच्या मदतीने चंदनचे शीर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.






