देगलूर नगर परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीकडून १८ महिला उमेदवार दिल्या आहेत (फोटो - सोशल मीडिया)
देगलू : लक्ष्मीकांत पदमवार : देगलूर शहराचा अपेक्षित विकास अद्याप पूर्णत्वास न गेल्याने नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. या समस्यांपासून मुक्त करून शहराचा दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समन्वयक लक्ष्मीकांत पदमवार यांनी सांगितले. ते २७ नोव्हेंबर रोजी दैनिक नवराष्ट्रशी संवाद साधताना बोलत होते.
२ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी विजयमाला बालाजी टेकाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये शोभा कडलवार, रोहिणी मैलागीरे, शैलजा पाशमवार, शेख मोईन, छायाबाई गायकवाड, सना फातेमा, संतोषी सोनकांबळे, यास्मिन कुरेशी, योगेश्वरी तोटावार, सोहेल चाऊस, अनिल बोन्लावार, रत्नमाला कौरवार, मीनाक्षी कांबळे, एडवोकेट अंकुश देसाई, नंदकुमार शाखावार, आरशिया फातिमा, कृतिका जोशी, बबलू टेकाळे, कोमल मैलागीरे, लक्ष्मीकांत पदमवार, जमीन बेगम, उज्वला पदमवार, सुमंत कांबळे, पल्लवी ह्याडे, कलावतीबाई मोरे, पुष्पाताई उल्लेवार, साई कुमार गंदपवार अशा एकूण २७उमेदवारांना संधी देण्यात आली असून त्यात १८ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
महायुती 2 तारखेपर्यंत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने उडणार राजकीय भडका?
२६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यासंदर्भात दैनिक नवराष्ट्रने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे समन्वयक लक्ष्मीकांत पदमवार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी पदमवार यांनी सांगितले की, २००७ ते २०१७दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात देगलूरच्या विकासासाठी अनेक कामे करण्यात आली. त्यात छत्रपती शिवाजी उद्यानाचे सुशोभीकरण, नवीन नगरपरिषद प्रशासकीय इमारत, व्यापारी संकुले, २४ कोटींची पाणीपुरवठा योजना, शहर हद्दवाढ, NUHM अंतर्गत दवाखाना, भुयारी गटार योजना, केरूर तलाव सुशोभीकरण, मुस्लिम शादी खाना, डम्पिंग ग्राउंड, स्मशानभूमी विकास इत्यादी कामांचा समावेश आहे.
अंतयात्रा काढली..घाटावर चिता पेटणार एवढ्यात…; समोर आला 50 लाखांचा डाव, Video Viral
राष्ट्रवादीचा जाहीरनामा
आगामी कार्यकाळासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा जाहीर करत अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत. त्यात लेंडे धरणातून शहराला दररोज पाणीपुरवठा, शहरातील सर्व नागरिकांचा अपघात विमा, बीजगुंडणी केंद्राची ३० एकर जागा नगरपरिषदेकडे वर्ग करणे, प्रमुख रस्त्यांवर प्रवेशद्वार, भोगवटादारांचा प्रश्न मार्गी लावणे, सिमेंट रस्ते, लेंडी नदीवरील पूल, डीपी रस्त्यांचा विकास, केरूर तलाव पर्यटनस्थळ, मुस्लिम युवकांसाठी रोजगार, शहराबाहेर कत्तलखान्याचे स्थलांतर वातानुकूलित अभ्यासिका, आवास योजनांतील कर माफी, बिरसा मुंडा स्मारक, मोहल्ला क्लिनिक, महिलांसाठी सुरक्षा उपाय, व्यापारी सुविधा वाढविणे, हरित देगलूर उपक्रम, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन आणि संपूर्ण शहर सीसीटीव्ही निगराणीखाली आणणे यांचा समावेश आहे. पदमवार यांनी विश्वास व्यक्त केला की, आगामी निवडणुकीत सत्ता मिळाल्यास देगलूर शहराचा वेगवान व सर्वसमावेशक विकास होईल.






