Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: २० आमदारांची ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवारांशी खलबतं; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

सुनेत्रा पवार यांनी कालच्या आमदारांच्या बैठकीसाठी आलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेली चप्पल आणि घड्याळ या वस्तू सगळ्यांना दाखवल्या.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 05, 2026 | 12:21 PM
Ajit Pawar Plane Crash: २० आमदारांची ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवारांशी खलबतं;  राष्ट्रवादीत घडामोडींना वेग
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीचे २० आमदार अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला पोहोचले
  • रोहित पवारांप्रमाणेच या आमदारांनीही DGCA च्या अहवालातील त्रुटींवर शंका व्यक्त केली
  • सुनेत्रा पवारांनी अपघाताच्या ठिकाणाहून मिळालेले अजितदादांचे घड्याळ आणि चप्पल आमदारांना दाखवले.
 

Ajit Pawar Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात संशय दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत VSR या विमान कंपनी आणि नागरी उड्डाण संचलनालय (DGCA) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवाार यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय रोहित पवार सातत्याने व्यक्त करत आहेत. या सगळ्या घडामोडीत बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आमदार अचानक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. या भेटीत आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याशी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.   (Ajit Pawar Plane Crash)

मिळालेल्या माहितीनुसार, देवगिरी बंगल्यावर दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या २० आमदारांनीदेखील अजित पवार यांच्या निमान दुर्घटनेबाबत शंका उपस्थित केली आहे. DGCAने नुकताच अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल सादर केला. त्यानंतर रोहित पवार यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे आमदारही विमान अपघाताबाबत आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदारांकडूनही शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या भेटीत आमदारांनी शंका उपस्थित केल्या आहे.

Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी  अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI मार्फत चौकशी व्हावी, या आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या मागणीचे पुढे काय झाले, याबाबत मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विचारावे, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागणी केली आहे. त्यावर आपण सर्वजण पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याची भेट घेऊ, असंही या आमदारांकडून सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आमदार रोहित पवार यांच्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांकडूनही विमान अपघाताच्या अहवालात त्रुटी असल्याचे सांगितले जात आहे. या अहवालाबाबत अनेक प्रश्न आणि शंका आमदारांकडून उपस्थित करण्यात आल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर आलेल्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्र चर्चा केल्याचेही सांगितले जात आहे.

सुनेत्रा पवार यांनी कालच्या आमदारांच्या बैठकीसाठी आलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेली चप्पल आणि घड्याळ या वस्तू सगळ्यांना दाखवल्या. त्या अनुषंगानेही सुनेत्रा पवार यांच्याशी आमदारांनी चर्चा केली. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा

अजित पवारांच्या जिवाला धोका- रोहित पवार

“दादांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही राहुल गांधींना भेटू. आम्ही त्यांना लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यास सांगू. असंही रोहित पवारांनी सांगितलं. रोहित पवार म्हणाले, “घटनेपूर्वी दादा सुमारे पाच महिने अत्यंत खबरदारी घेत होते. त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे बंद केले होते; ते फक्त काचेच्या ग्लासमधून पाणी पित होते. पाणी दूषित करण्याचा प्रयत्न असू शकतो. अजित दादांना आम्ही विचारलं, ते असं का करत आहेत, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की, त्यांना सावध राहण्याच्या आणि खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ते सरकारी सुरक्षा रक्षकांसोबतच खाजगी सुरक्षा रक्षकही सोबत ठेवत होते.असा दावा रोहित पवार यांनी केला.

 

Web Title: 20 mlas hold secret meeting with sunetra pawar at devagiri bungalow regarding ajit pawar plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • ajit pawar plane crash
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
1

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
2

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय
3

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.