Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today:सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ; अवघ्या ८ दिवसांत १ कोटीहून अधिक फॉलोअर्स

Maharashtra Breaking News : सोशल मीडियाच्या इतिहासात इतक्या कमी वेळात एखाद्या चळवळीने किंवा पेजने एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळवण्याचा हा आतापर्यंतचा सर्वोच्च आणि ऐतिहासिक आकडा ठरला आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 22, 2026 | 11:23 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 22 May 2026 11:23 AM (IST)

    22 May 2026 11:23 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात डिझेल टंचाई

    मागील चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा परिणाम झाला आहे, डिझेल मिळत नसल्याने जिल्ह्यात एक हजार पेक्षा अधिक ट्रॅक चार ते पाच दिवसापासून अडकून पडले आहेत. परराज्यातील वाहनचालक देखील डिझेल मिळत नसल्याने अडकून पडले आहेत.

  • 22 May 2026 11:16 AM (IST)

    22 May 2026 11:16 AM (IST)

    परभणीत डिझेलसाठी सातबारा दाखवण्याची अट

    इंधनटंचाईचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. शेतीच्या कामासाठी इंधनाची आवश्यकता असणाऱ्या शेतकरी पेट्रोलपंपावरून डिझेल घेऊन जात असतात. मात्र, परभणीत 7/12 दाखवला तरच इंधन मिळणार असल्याचे पेट्रोल पंप चालकांनी सांगितले आहे.

  • 22 May 2026 11:07 AM (IST)

    22 May 2026 11:07 AM (IST)

    प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीला

    भाजप आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांना भेटले आहेत. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रसाद लाड म्हणाले की, दादांच्या सात आठ मागण्या मी समजून घेणार आहे. मागण्या मान्य का होऊ शकल्या नाहीत हे समजून घेणार आहे.

  • 22 May 2026 11:04 AM (IST)

    22 May 2026 11:04 AM (IST)

    Pulwama हल्ल्याचा बदला? मास्टरमाइंड हमजा बुर्हान ठर; हत्येमागे भारताच्या ‘या’ कुख्यात

    भारतातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या पुलवामा हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हमजा बुर्हान याची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या काश्मीर खोऱ्यातील मुझफ्परबाद येथे अदांधुंद गोळीबारात त्याला ठार करण्यात आले असून या हल्ल्यांची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅँगने स्वीकारलच्या दावा सोशल मीडियावर केला जात आहे. परंतु अद्याप अधिकृतपण याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

     

  • 22 May 2026 10:54 AM (IST)

    22 May 2026 10:54 AM (IST)

    विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत धुसफूस? संजय शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण

    छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद जागेवर भाजपने दावा केल्याच्या चर्चावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही या जागेवर दावा केला आहे. ही जागा पूर्वीपासून शिवसेनेची आहे आणि पुढेही शिवसेनेचीच राहील, भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी ही जागा आम्ही सोडणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले. संजय शिरसाट म्हणाले, शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तालुकानिहाय बैठका घेतल्या जात असून, या मोहिमेचे नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे करत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची त्याती सुरू आहे.

  • 22 May 2026 10:44 AM (IST)

    22 May 2026 10:44 AM (IST)

    अवघ्या दशकानंतर शुभंकर तावडे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर!

    अभिनेता शुभंकर तावडे जवळपास दशकानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. त्याला TV क्षेत्रात काम करताना पुन्हा एकदा पाहण्यासाठी त्याचे चाहतेमंडळी उत्सुक आहेत. अभिनेता स्टार प्रवाहवरील आगामी मालिका ‘पाठराखीण’ मध्ये झळकणार आहे. पाठराखीण मालिकेत प्राजक्ता गायकवाड आणि अभिनेत्री गौरी इंगवले या दोन बहिणी आणि त्यांच्या नात्यावर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. याच मालिकेत आलोक सूर्यवंशीच्या भूमिकेत शुभंकर तावडे दिसून येणार आहे. तर त्याच्या जोडीला त्याचा सख्खा लहान भाऊ म्हणून आरव सूर्यवंशी हे पात्र अभिनेता आशय कुलकर्णी साकारणार आहे.

  • 22 May 2026 10:34 AM (IST)

    22 May 2026 10:34 AM (IST)

    इराण उद्ध्वस्त होणार? युरेनियम संवर्धानाबाबत दिला थेट इशारा

    इराण आणि अमेरिकेतील तणाव प्रचंड वाढत चालला आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला आक्रमक इशारा दिला आहे. इराणकडे असलेला अत्यंत संवेदनशील आणि घातक युरेनियम साठा अमेरिकेच्या ताब्यात घेणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गरज पडल्यास युरेनियमचा साठा नष्टही करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ न देणे यामागाचा उद्दिष्ट असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

  • 22 May 2026 10:24 AM (IST)

    22 May 2026 10:24 AM (IST)

    अल्पवयीन मुलीवर दोघांकडून जीवघेणा हल्ला; घरात कोणी नसल्याची संधी साधली अन्

    दर्यापूरमधील आनंद नगर भागात अल्पवयीन मुलगी घरात असताना तिच्या घरात शिरून दोन अनोळखी भामट्यांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चार-पाच दिवसांपूर्वी याच भागातील प्रज्वल तायडे या तरूणाचा घरात शिरून खून करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच हा पुन्हा हल्ला करण्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • 22 May 2026 10:14 AM (IST)

    22 May 2026 10:14 AM (IST)

    गेममध्ये MOCO Store ची धमाकेदार एंट्री! ब्रिस्क गॅल्प आणि लक रॉयल व्हाउचरसह जिंका

    Free Fire Max मध्ये मोको स्टोअर लाईव्ह झाला आहे. हा अरायव्हल ॲनिमेशन मोको स्टोअर आहे. या स्टोअरद्वारे प्लेअर्सना गेममधील एक्सक्लूसिव इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. मोको स्टोअरमध्ये इन गेम रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला स्पिन करावे लागणार आहे. गेममध्ये स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्सचा वापर करावा लागतो.

  • 22 May 2026 10:04 AM (IST)

    22 May 2026 10:04 AM (IST)

    नवं घर नि नवी गाडी! Anshuman Vichare ने आणखीन एक दिला सुखद धक्का

    अभिनेता अंशुमन विचारे त्याच्या आगामी सिनेमामुळे सध्या चर्चेत आला आहे. अभिनेता 5 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणाऱ्या तुंबाडची मंजुळा या सिनेमात झळकणार आहे. अशामध्ये अगदी काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्याने त्याच्या नव्या घराचे गृहप्रवेश तसेच गणेशपूजेचे कार्यक्रम हुरकले होते. आता अभिनेत्याच्या नव्या घरात लक्ष्मीने गृहप्रवेश केला आहे. अभिनेत्याने नवीन गाडी खरेदी केली आहे. काहीच महिन्यांपूर्वी घर खरेदी केले, काही दिवसांपूर्वी त्या घरामध्ये गणेशपूजन झाले तसेच आता नव्या गाडीमुळे, Anshuman Vichare च्या चाहत्यांना नक्कीच सुखद धक्का मिळाला आहे.

  • 22 May 2026 09:35 AM (IST)

    22 May 2026 09:35 AM (IST)

    Fuel Crisis: इंधन टंचाई संकट निवारणासाठी  नरेंद्र मोदींनी सुत्रे हातात घेतली

    Fuel Crisis:   इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सातत्याने सुरू असून, या जागतिक संघर्षाचा थेट आणि मोठा तणाव आता भारतातही जाणवू लागला आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'होर्मुज खाडी' पूर्णपणे बंद झाली असून, याचा जागतिक पुरवठा साखळीवर (सप्लाय चेन) अत्यंत विपरीत परिणाम झाला आहे. होर्मुज खाडी बंद झाल्याने भारतात येणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

    इंधनाच्या दरात मोठी वाढ: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने देशात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या (CNG) किमतीत कमालीची वाढ झाली आहे.

    एलपीजी गॅसचा तुटवडा आणि महागाई: देशात सध्या एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा जाणवत असून, सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळेनासे झाले आहे. या टंचाईमुळे व्यावसायिक वापराच्या गॅसवरही परिणाम झाला असून, अनेक लहान-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. परिणामी, देशात महागाईचा आलेख वेगाने वर गेला आहे.

  • 22 May 2026 09:30 AM (IST)

    22 May 2026 09:30 AM (IST)

    Energy Crisis: इराण-अमेरिका युद्धादरम्यान भारताला मोठा दिलासा

     Iran- America Energy Crisis:  इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे सध्या भारत एका अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. होर्मुज खाडी बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली असून, भारतासमोर कच्च्या तेलासोबतच एलपीजी (LPG) गॅसचेही मोठे संकट उभे राहिले आहे. या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर असताना त्यांनी द्विपक्षीय बैठकांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले.

    या घडामोडींनंतर, आता आपल्या आगामी भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी भारताबद्दल एक अत्यंत मोठे आणि सकारात्मक विधान केले आहे. "नवी दिल्लीला जितकी ऊर्जा खरेदी करायची असेल, तेवढी आम्ही त्यांना पुरवू," असे आश्वासन रुबियो यांनी दिले आहे. म्हणजेच, भारत आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अमेरिकेकडून हवे तितके कच्चे तेल आणि एलपीजी गॅस खरेदी करू शकतो, अशी उघड तयारी अमेरिकेने दर्शवली आहे.

  • 22 May 2026 09:25 AM (IST)

    22 May 2026 09:25 AM (IST)

    Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर दुहेरी संकट; विदर्भात 'रेड अलर्ट' तर कोकणात वादळी पावसाचा 'यलो अलर्ट'

    Maharashtra Weather Update : मे महिना महाराष्ट्रासाठी अत्यंत त्रासदायक ठरत असून सध्या राज्यावर हवामानाचे दुहेरी संकट घोंघावत आहे. एकीकडे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे विदर्भात सूर्य आग ओकत असून उष्णतेचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. हवामान विभागाने विदर्भातील ३ जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, नागरिकांनी दुपारी ११ ते ४ या वेळेत अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे. २२ मे रोजीच्या हवामान अंदाजानुसार राज्यातील विविध भागांतील परिस्थिती खालीलप्रमाणे असेल:

    मुंबई आणि पालघर: मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वाऱ्याची दिशा बदलली असून, आज मुंबई आणि पालघर परिसरात हवामान अत्यंत उष्ण आणि दमट (ह्युमिड) राहण्याची शक्यता आहे.

    ठाणे आणि दक्षिण कोकण: ठाण्यासह दक्षिण कोकणात वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

    रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील २४ तासांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ३० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहू शकतात. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला २४ तासांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

  • 22 May 2026 09:20 AM (IST)

    22 May 2026 09:20 AM (IST)

    Kolhapur Crime:  कोल्हापुरात तरुणाची चाकूने भोसकून भरदिवसा हत्या

    Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे सोशल मीडियावरील ग्रुपवर केलेल्या कमेंटच्या रागातून एका २९ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून भरदिवसा हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही भयंकर घटना घडली असून, साहिल झाकीर काझी (वय २९) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजू लक्ष्मण कांबळे (वय ३०) या आरोपीला अटक केली आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

  • 22 May 2026 09:15 AM (IST)

    22 May 2026 09:15 AM (IST)

    AI Impact: स्टँडर्ड चार्टर्ड बँक ७,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार

    AI Impact:  कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनच्या वाढत्या वापरामुळे जागतिक स्तरावर नोकऱ्यांवर मोठा परिणाम होत असून, आता बँकिंग क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसणार आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत बँक २०३० पर्यंतच्या पुढील चार वर्षांत तब्बल ७,००० हून अधिक नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे.

    एका अहवालानुसार, लंडनस्थित असलेल्या या बँकेने २०३० पर्यंत आपल्या कॉर्पोरेट विभागांमधील सुमारे १५ टक्के पदे कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोठ्या पुनर्रचनेचा थेट परिणाम संबंधित विभागांमध्ये काम करणाऱ्या ५२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांपैकी ७,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर होणार आहे. सध्या ही बँक जगभरात अंदाजे ८२,००० लोकांना रोजगार देते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बिल विंटर्स यांच्या मते, हे पाऊल केवळ खर्च कपातीपुरते मर्यादित नसून, ते बँकेच्या एका मोठ्या तांत्रिक परिवर्तनाचा भाग आहे.

  • 22 May 2026 09:10 AM (IST)

    22 May 2026 09:10 AM (IST)

    Monsoon Preparations: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली महत्त्वाची बैठक 

    Monsoon Preparations:  राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. आज दुपारी मुंबईतील 'सह्याद्री' अतिथीगृह येथे ही बैठक पार पडणार असून, यामध्ये मुख्यमंत्री राज्यातील मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेणार आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कालच राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेतला होता, त्यानंतर आज लगेचच मान्सूनपूर्व कामांची चाचपणी करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

Maharashtra to National And International Breaking News:

Cockroach Janta Party: सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ; अवघ्या ८ दिवसांत १ कोटीहून अधिक फॉलोअर्स

देशभरात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला लोकांनी याला निव्वळ एक गंमत समजले होते, पण काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होऊ लागला आहे.

गेल्या १५ मे रोजी स्थापन झालेल्या या कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. अवघ्या आठ दिवसांच्या अल्प कालावधीत या पार्टीने तब्बल १ कोटी १८ लाख ७० हजार फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियाच्या इतिहासात इतक्या कमी वेळात एखाद्या चळवळीने किंवा पेजने एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळवण्याचा हा आतापर्यंतचा सर्वोच्च आणि ऐतिहासिक आकडा ठरला आहे.

 

 

Web Title: 22nd may 2026 marathi news maharashtra national international breaking sports crime share market live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

MLC Election 2026: विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत धुसफूस? संजय शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
1

MLC Election 2026: विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत धुसफूस? संजय शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण

मराठी तरुणाची डिजिटल क्रांती! ‘Cockroach Janta Party’मागचा चेहरा कोण? जाणून घ्या अभिजीत दिपके यांची कहाणी
2

मराठी तरुणाची डिजिटल क्रांती! ‘Cockroach Janta Party’मागचा चेहरा कोण? जाणून घ्या अभिजीत दिपके यांची कहाणी

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन
3

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन

Triple Alert For India: पेट्रोल आणि डिझेल आणखी महागणार! गीता गोपीनाथ यांचा मोठा इशारा, म्हणाल्या, “आता गंभीर…”
4

Triple Alert For India: पेट्रोल आणि डिझेल आणखी महागणार! गीता गोपीनाथ यांचा मोठा इशारा, म्हणाल्या, “आता गंभीर…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.