Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: E20 इंधनाविरोधात ४ ऑगस्टला संसदेला टॅक्सी संघटनांचा घेराव

Maharashtra Breaking: घटलेले मायलेज आणि वाढलेला देखभाल खर्चः देशभरातील चालकांनी तक्रार केली आहे की २० टक्के इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज कमी झाले आहे आणि इंजिनच्या देखभालीचा खर्च वाढला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 27, 2026 | 09:20 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today

Maharashtra Breaking News Updates Today

Follow Us
Follow Us:
  • 27 Jul 2026 09:30 AM (IST)

    27 Jul 2026 09:30 AM (IST)

    20 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका

    पंजाब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला शिक्षिकेचे तिच्या २० वर्षीय विद्यार्थ्यांसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. ही बाब समजल्यानंतर तिच्या पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी महिला शिक्षिकेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र तिने नवऱ्यासोबत घटस्फोट घेईल पण विध्यार्थ्याला सोडणार नाही. महिला या होणाऱ्या प्रयत्नांमुळे संतापली आणि ती आपल्या मुलीला घेऊन माहेरी गेली. यांनतर तिच्या पतीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घडलेली घटना चंदीगड येथील आहे.

  • 27 Jul 2026 09:20 AM (IST)

    27 Jul 2026 09:20 AM (IST)

    US-Iran Conflict:  कच्च्या तेलाच्या किमतीत ६ टक्क्यांची मोठी घसरण 

    US-Iran Conflict:  इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्षाने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवली होती. या युद्धाचे दाहक परिणाम केवळ या दोन देशांपुरते मर्यादित न राहता भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थांवर दिसून येत होते. वाढती महागाई, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत होते. होर्मुजच्या खाडीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून होणारे हल्ले आणि अमेरिकेकडून इराणवर सुरू असलेले प्रतिहल्ले यामुळे पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

  • 27 Jul 2026 09:20 AM (IST)

    27 Jul 2026 09:20 AM (IST)

    गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत

    जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा परिणाम आज २७ जुलै रोजी भारतीय शेअर बाजारावर होणार आहे. भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सोमवारी तेजीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १४०.५ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २३,९४७ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

  • 27 Jul 2026 09:15 AM (IST)

    27 Jul 2026 09:15 AM (IST)

    IND vs ZIM T20 Series: भारताचा झिम्बाब्वेवर ३-० ने दणदणीत विजय

    IND vs ZIM T20 Series:  भारताने तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ३५ धावांनी धुव्वा उडवत तीन सामन्यांची मालिका ३-० ने आपल्या खिशात घातली आहे. यापूर्वीच्या दोन टी-२० मालिकांमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर, भारतीय संघाने या मालिकेत जोरदार पुनरागमन करत मालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा हा पहिलाच टी-२० मालिका विजय ठरला आहे.

    वातावरणाचे आव्हान पेलत मिळवला विजय

    इंग्लंड दौऱ्यानंतर झिम्बाब्वेतील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय खेळाडूंना फारसा वेळ मिळाला नव्हता. खेळाडूंनी या अडचणींबाबत आधी खंत व्यक्त केली होती; मात्र सर्व कारणे बाजूला ठेवून संघाने मैदानातील कामगिरीवर लक्ष केंद्रित केले.

  • 27 Jul 2026 09:10 AM (IST)

    27 Jul 2026 09:10 AM (IST)

    E20 इंधनाविरोधात एल्गार

    E20 Fuel Protest:  टॅक्सी संघटना ई २० इंधनाविरोधात ४ ऑगस्ट रोजी संसदेला घेराव घालण्याची तयारी करत आहेत. जंतर मंतर येथे ३६ दिवस चाललेल्या विद्यार्थी आणि जनरेशन-झेड आंदोलनानंतर, आता इथेनॉलविरोधात एका मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. देशात २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ई२० इंधन) वापरण्यावाचत अखिल भारतीय पर्यटक परवाना टॅक्सी चालक आणि वाहतूकदारांचा असंतोष आता रस्त्यावर उतरत आहे.

  • 27 Jul 2026 09:05 AM (IST)

    27 Jul 2026 09:05 AM (IST)

    Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी

    Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; गोदावरी पात्रात मोठी वाढ, हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट' जारीमुंबई: राज्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. मुसळधार पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी नाशिकसह राज्यातील अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरींमुळे हाहाकार उडाला आहे.

    घाटमाथ्यावर अतिजोरदार पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकणासह घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे.

    कमी दाबाचा पट्टा: ओराई, सिधी आणि रांची या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून अधिक सक्रिय झाला आहे.

    नीचांकी तापमान: थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे १८.५ अंश सेल्सिअस या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
    घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट: सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 27 Jul 2026 08:55 AM (IST)

    27 Jul 2026 08:55 AM (IST)

    Majhi Ladki Bahin Scheme: '१५०० रुपये केवळ शॉपिंगवर उडवू नका, बचतही करा: आदिती तटकरेंचा सल्ला

    Majhi Ladki Bahin Scheme:  राज्य सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेवरून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. "लाडक्या बहिणींनी योजनेचे मिळणारे सर्वच १५०० रुपये केवळ शॉपिंगवर खर्च न करता, त्यातील काही रकमेची बचतही करावी," असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, नव्याने उभारण्यात आलेल्या 'महिला व बालविकास भवना'च्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

  • 27 Jul 2026 08:45 AM (IST)

    27 Jul 2026 08:45 AM (IST)

    MPSC Paper Leak: 'एमपीएससी'च्या औषध निरीक्षक भरतीवर पेपरफुटीचे सावट 

    MPSC Paper Leak:  देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची उष्णता शांत होत नाही तोच, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रियेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 'एमपीएससी'मार्फत पार पडलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार आणि घोळ झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

    या भरती प्रक्रियेत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचा दावा करत दोन बाधित उमेदवारांनी थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे पुराव्यांसह लेखी तक्रार नोंदवली आहे. तक्रारदारांनी आपल्या अर्जात भरती प्रक्रियेतील संशयास्पद बाबींवर बोट ठेवले असून, या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी संपूर्ण भरतीची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी केली आहे.

  • 27 Jul 2026 08:40 AM (IST)

    27 Jul 2026 08:40 AM (IST)

    Exam Reform Bill 2026: पेपरफुटीविरोधात केंद्र सरकारचे कठोर पाऊल 

    Exam Reform Bill 2026:  देशभरात गाजत असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अखेर एक अत्यंत मोठे आणि कठोर पाऊल उचलले आहे. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे 'सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक २०२६' (Exam Reform Bill 2026) आज (२७ जुलै) लोकसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय कामगार आणि सार्वजनिक तक्रार निवारण राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आज दुपारी १२ वाजता हे महत्त्वपूर्ण विधेयक सभागृहात सादर करतील.

  • 27 Jul 2026 08:25 AM (IST)

    27 Jul 2026 08:25 AM (IST)

    Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच!

    Gold Rate Today: भारतात 27 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,492 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,284 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,869 रुपये आहे. भारतात 27 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,32,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,44,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,690 रुपये आहे. भारतात 27 जुलै रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 239.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,39,900 रुपये आहे.

Maharashtra to National And International Breaking News: 

E20 इंधनाविरोधात एल्गार; ४ ऑगस्टला संसदेला टॅक्सी संघटनांचा घेराव

E20 Fuel Protest:  टॅक्सी संघटना ई २० इंधनाविरोधात ४ ऑगस्ट रोजी संसदेला घेराव घालण्याची तयारी करत आहेत. जंतर मंतर येथे ३६ दिवस चाललेल्या विद्यार्थी आणि जनरेशन-झेड आंदोलनानंतर, आता इथेनॉलविरोधात एका मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. देशात २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ई२० इंधन) वापरण्यावाचत अखिल भारतीय पर्यटक परवाना टॅक्सी चालक आणि वाहतूकदारांचा असंतोष आता रस्त्यावर उतरत आहे. दिल्ली टॅक्सी आणि पर्यटक वाहतूकदार आणि टूर ऑपरेटर्स असोसिएशनने ई २० पेट्रोल धोरणे, वाहनांचे घटणारे मावलेज आणि कडक नियमांविरुद्ध निषेध करण्यासाठी ४ ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

 

Web Title: 27 july 2026 live breaking news marathi maharashtra politics cjp protest sonam wangchuk delhi students protest e20 fuel policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Marathi News
  • national news

संबंधित बातम्या

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी
1

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये
2

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी
3

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी

Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा! बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी; सरकारने दिला इशारा
4

Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा! बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी; सरकारने दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.