Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा! बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी; सरकारने दिला इशारा

भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी Air Suvidha 2.0 हे पोर्टल वापरणे अनिवार्य असतानाच, या नावाने बनावट वेबसाईट्स बनवून प्रवाशांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तातडीने ॲडव्हायझरी जारी केली

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 26, 2026 | 06:18 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा!
  • बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी
  • सरकारने दिला गंभीर इशारा
Air Suvidha 2.0 सुविधेसाठी तुम्हीही फॉर्म भरत असाल तर सावध रहा. कारण सायबर गुन्हेगार लोकांच्या बँक खात्यांमध्ये घुसखोरी करण्यासाठी दररोज नवनवीन युक्त्या वापरत आहेत. आता, सायबर गुन्हेगारांनी ‘एअर सुविधा २.०’ च्या नावाखाली एक सापळा रचला आहे. अधिकृत पोर्टल असल्याचा दावा करणाऱ्या अनेक बनावट वेबसाइट्स हवाई प्रवाशांकडून पैसे उकळत आहेत. या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यासंदर्भात नुकतीच त्यांनी सुचना जारी केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

Inflation Impact: महागाईचा सामान्यांना दणका! Tata चा मोठा निर्णय; चहा, डाळ अन् मसाल्यांच्या किमती वाढल्या

मंत्रालयाकडून काय सूचना?

मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘एअर सुविधा २.०’ ही सुविधा १००% मोफत आहे. प्रवासी आरोग्य स्वयं-घोषणापत्र सादर करण्यासाठी सरकारला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. जर एखादी वेबसाइट फॉर्म भरण्याच्या किंवा सादर करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करत असेल, तर तुम्ही एका बनावट साइटवर आला आहात.

काय आहे Air Suvidha 2.0?

Air Suvidha 2.0 हे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (DIAL) आणि आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) यांनी संयुक्तपणे विकसित केलेले एक डिजिटल आणि संपर्करहित प्रवासी आरोग्य स्वयं-घोषणा पोर्टल आहे. इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून याची अंमलबजावणी करण्यात आली. भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअरन्सपूर्वी मागील २१ दिवसांचा त्यांचा प्रवासाचा इतिहास आणि आरोग्याचा तपशील देणे आवश्यक आहे. हा फॉर्म भारतात आगमनाच्या २४ तास आधीपर्यंत अधिकृत वेबसाइटवर भरता येतो. काही फसवणूक करणाऱ्यांनी प्रवाशांची फसवणूक करण्यासाठी एअर सुविधा सारख्या नावांनी वेबसाइट्स तयार केल्या आहेत.

फसवणूक कशी टाळायची?

URL काळजीपूर्वक तपासा: कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी, ते अधिकृत सरकारी पोर्टल असल्याची खात्री करण्यासाठी वेबसाइटचा URL काळजीपूर्वक तपासा.
वैयक्तिक माहिती देऊ नका: संशयास्पद पोर्टल्सवर पासपोर्ट, बँक किंवा आरोग्याशी संबंधित माहिती देऊ नका.
केवळ अधिकृत स्रोतांकडूनच माहिती मिळवा: एअर सुविधा २.० शी संबंधित कोणत्याही नवीन माहितीसाठी किंवा बदलांसाठी, केवळ सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनांवरच अवलंबून रहा.

भारतीयांना कॉफी विकून कोट्यवधी कमवणाऱ्या इंग्रजी कंपनीला मोठा धक्का, गेल्या 5 वर्षांत पहिल्यांदा असं काही घडलं की…

Web Title: Cyber fraud beware of fake air suvidha 2 0 websites civil aviation advisory marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Aviation
  • Business News
  • cyber
  • Cyber Attack
  • cyber scam
  • flight ticket
  • Marathi News

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.