Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: पुण्यात डिझेलचे दर भडकले;  प्रति लिटर ४ रुपयांहून अधिकची वाढ

Maharashtra Breaking News: शासकीय निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून विभागीय आयुक्तांनी खेडच्या सरपंचांना त्यांच्या पदावरून तातडीने निलंबित केले आहे. या निलंबनाच्या कारवाईमुळे शासकीय निधीत गडबड करणाऱ्यांना प्रशासनाने एक प्रकारे कडक इशारा दिला आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 27, 2026 | 11:00 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 27 May 2026 11:00 AM (IST)

    27 May 2026 11:00 AM (IST)

    25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये कोण ठरणार वरचढ? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

    भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये बजेट स्मार्टफोन्सची सर्वाधिक चर्चा असते. सध्या बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये चर्चेत असलेले स्मार्टफोन्स आहेत Vivo T5x 5G आणि OnePlus Nord CE 6 Lite. ज्या यूजर्सना कमी किंमतीत दमदार बॅटरी, चांगला कॅमेरा आणि स्मूद परफॉर्मंस पाहिजे आहे, अशा यूजर्सचं लक्ष विवो टी 5 एक्स 5G आणि वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईटकडे असतं. या स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्समधील फरक जाणून घेऊया.

  • 27 May 2026 10:50 AM (IST)

    27 May 2026 10:50 AM (IST)

    दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्घृण हत्या; जालन्यात खळबळ

    जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्गुण हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. हा घडलेला प्रकार मंठा शहरातील जवाहरलाल कॉलनी परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे.

  • 27 May 2026 10:40 AM (IST)

    27 May 2026 10:40 AM (IST)

    BYD ची ‘ही’ टेक्नॉलॉजी आहे अत्यंत खास, 1100km पर्यंत मिळणार रेंज

    जगभरात इलेक्ट्रिक कार्सची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. आजही, लांबचा प्रवास करताना चार्जिंग स्टेशन्स कुठे मिळतील आणि वारंवार थांबावे लागेल का, ही बहुतेक लोकांची सर्वात मोठी चिंता असते. या समस्येवर उपाय म्हणून, चीनची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी, BYD, आपले नवीन DM-i सुपर प्लग-इन हायब्रीड तंत्रज्ञान भारतात सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा दावा आहे की, हे तंत्रज्ञान इलेक्ट्रिक कारप्रमाणेच सुरळीत आणि शांत ड्रायव्हिंगचा अनुभव देईल, तसेच पेट्रोल इंजिनच्या उपस्थितीमुळे लांबच्या प्रवासाची चिंता मोठ्या प्रमाणात दूर होईल.

  • 27 May 2026 10:30 AM (IST)

    27 May 2026 10:30 AM (IST)

    सिंधू पाणी वाटप करारावर पुन्हा गयावया करु लागला पाकिस्तान

    भारताचा शत्रू देश पाकिस्तान(Pakistan) ने पुन्हा एकदा भारताकडे धाव घेतली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मंचावरुन सिंदू पाणी वाटप करारावरुन भारतासमोर हात पसरले आहे. २२ एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. भारताने घेतलेल्या काही आक्रमक निर्णयांमध्ये सिंधु पाणी वाटप करारही स्थिगित करण्यात आला होता. यामुळे पाकिस्तान पुरता हादरला होता.

  • 27 May 2026 10:20 AM (IST)

    27 May 2026 10:20 AM (IST)

    ३६ पगारी सुट्ट्या आणि नो ओव्हरटाईम! ‘हा’ देश ठरला वर्क-लाइफ बॅलन्समध्ये जगात अव्वल

    जगात जिथे बहुतांश लोक दररोज ९ ते १० तास नोकरी करून थकून जातात. तिथे असेही काही देश आहेत, जिथे कामापेक्षा वैयक्तिक आयुष्याला जास्त महत्त्व देतात. या देशांमध्ये कामाचा ताण अत्यंत कमी असतो. त्यांना कुटुंब आराम व स्वत:च्या छंदासाठी भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे येथे नोकरी हा तणावाचा भाग नसून समाधानाचा भाग बनते.

  • 27 May 2026 10:10 AM (IST)

    27 May 2026 10:10 AM (IST)

    एलिमिनेटरमध्ये सनराझर्स भिडणार राजस्थान रॉयल्सशी, कोणाचा पगडा भारी

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये आपली जागा सुनिश्चित केली आहे आणि आयपीएल २०२६ चा एलिमिनेटर सामना आज खेळला जाईल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा सामना रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी होईल. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे, तर राजस्थान चौथ्या स्थानी आहे. आतापर्यंत अनेक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले आहेत मात्र प्रत्येक वेळी सनराझर्सने बाजी मारली आहे.

  • 27 May 2026 10:00 AM (IST)

    27 May 2026 10:00 AM (IST)

    एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी

    गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांवर होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप स्वतः १२ जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.

  • 27 May 2026 09:50 AM (IST)

    27 May 2026 09:50 AM (IST)

    Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री!

    फ्री फायर मॅक्समध्ये नवीन वॉल रॉयल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ग्लू वॉल स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. इतर शस्त्रांसह ग्लू वॉल स्किन देखील या गेमचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ग्लू वॉल स्कीनच्या मदतीने प्लेअर्स शत्रूंपासून स्वत:च रक्षण करू शकतात. ग्लू वॉल स्किन तुमच्या आणि शत्रूच्या मध्ये एक भिंत तयार करते. गेममध्ये ग्लू वॉल स्किन खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना अधिक डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र ईव्हेंटमध्ये अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून प्लेअर्सना ग्लू वॉल स्किन क्लेम करण्याची संधी मिळते.

  • 27 May 2026 09:30 AM (IST)

    27 May 2026 09:30 AM (IST)

    Vidharbha Rainfall: विदर्भात उन्हाच्या 'रेड अलर्ट'दरम्यान अवकाळीचा तडाखा 

    Vidharbha Rainfall: विदर्भात एकीककडे उष्णतेचा रेड अलर्ट असतानाच नागपूर, भंडारा, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याला मंगळवारीअचानक अवकाळी पावसाचा तीव्र फटका बसला. सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार वादळी पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले.

    या अवकाळी पावसामुळे ४५-४६ अंश सेल्सिअस तापमानामुळे उकाड्याने होरपळणाऱ्या विदर्भीयांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

    या अवकाळी पावसात भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, या पावसामुळे बाजार समिती आणि उघड्यावर असलेला हरभऱ्याचा माल मोठ्या प्रमाणावर भिजला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे माल सुरक्षित स्थळी हलवण्यास वेळ न मिळाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • 27 May 2026 09:25 AM (IST)

    27 May 2026 09:25 AM (IST)

    Karnataka Politics: कर्नाटकच्या राजकारणात मोठी उलथापालथ; मुख्यमंत्री सिद्धारमैया गुरुवारी राजीनामा देण्याची शक्यता

    कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून एक   मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया गुरुवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासंबंधीच्या तीव्र हालचाली सुरू झाल्या आहेत.

    काँग्रेस हायकमांडने आगामी २०२९ च्या लोकसभा आणि इतर विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एक मोठी रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेस नेतृत्वाने सिद्धारमैया यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊन मोठी भूमिका निभावण्याचा प्रस्ताव दिला आहे. सिद्धारमैया यांनी बंगळुरू सोडून दिल्लीत काँग्रेसचा प्रमुख 'ओबीसी' (OBC) चेहरा म्हणून काम करावे, अशी पक्षाची तीव्र इच्छा आहे.

  • 27 May 2026 09:25 AM (IST)

    27 May 2026 09:25 AM (IST)

    Vidhan Parishad Election: शिवसेनेचा ६ जागांवर दावा; छत्रपती संभाजीनगर किंवा रायगडसाठी आग्रही 

    Vidhan Parishad Election:  राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळी सुरू झाली असून, यामुळे राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. महायुतीमध्ये (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) जागावाटपाचे गणित आणि अंतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच, शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.

     मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने महायुतीच्या जागावाटपात किमान ५ जागांवर आपला खंबीर दावा ठोकला आहे. एवढेच नव्हे तर, राज्यातील बदललेले राजकीय बलाबल आणि गुणवत्तेच्या (मेरिट) आधारे ६ वी जागाही शिवसेनेलाच मिळावी, अशी आग्रही मागणी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि इच्छुकांनी लावून धरली आहे.

  • 27 May 2026 09:20 AM (IST)

    27 May 2026 09:20 AM (IST)

    Vidhan Parishad Election: महायुतीत जागावाटपात रायगडची जागा तटकरेंना तर पालकमंत्रिपद गोगावलेंना?

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) जाहीर झाल्याने महायुतीमध्ये जागावाटपाच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. जागांच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अद्याप महायुतीचा अंतिम निर्णय प्रलंबित असतानाच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपल्यातील एका जुन्या आणि महत्त्वाच्या वादावर 'हुकूमी' मार्ग काढल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.

  • 27 May 2026 09:15 AM (IST)

    27 May 2026 09:15 AM (IST)

    राज्यात तब्बल 5 लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

    मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जात असली तरी अजूनही राज्यातील ५ लाख १६ हजारांहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर असल्याचे समोर येत आहे.

    राज्यातील १४ लाख 20 हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर २५ मे पर्यंत राज्यातील ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता. त्यामुळे ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.

  • 27 May 2026 09:10 AM (IST)

    27 May 2026 09:10 AM (IST)

    Share Market Today: बाजारात कोणते शेअर्स देऊ शकतात दमदार परतावा?

    India Share Market Update: भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आज व्यवहार करताना सावध राहण्याची गरज आहे. कारण आज २७ मे रोजी भारतीय शेअर बाजार लाल रंगात उघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, बुधवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे, कारण अमेरिका-इराण शांतता कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सावध आहेत.

    गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास ९७ पॉइंट्सच्या सवलतीवर, २३,८८२ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Maharashtra to National And International Breaking News:

Pune Fuel Update: पुण्यात डिझेलचे दर भडकले;  प्रति लिटर ४ रुपयांहून अधिकची वाढ

जागतिक बाजारातील घडामोडी आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे पुणे शहरात डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १० दिवसांतील दरांचा आढावा घेतला असता, डिझेलच्या किमतीने नवीन उच्चांक गाठल्याचे समोर आले आहे.  गेल्या १० दिवसांपूर्वी पुण्यात डिझेलचे दर ९४.३९ रुपये प्रति लिटरच्या आसपास होते. त्यानंतर सातत्याने झालेल्या दरवाढीमुळे हा दर ९९.१७ रुपये प्रति लिटरपर्यंत वर गेला आहे.  जर आजच्या सर्वोच्च दराची गेल्या १० दिवसांपूर्वीच्या दराशी तुलना केली, तर डिझेलच्या किमतीत ४.७८ रुपये प्रति लिटरची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. 

Web Title: 27th may 2026 live breaking news marathi maharashtra national international petrol disel price hike sports economy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Legislative Council Election : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी
1

Legislative Council Election : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी

सतेज पाटलांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचेच पुण्यात बॅनर; ‘कोल्हापुरचा पैलवान पुण्यात हरला’
2

सतेज पाटलांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचेच पुण्यात बॅनर; ‘कोल्हापुरचा पैलवान पुण्यात हरला’

Vidhan parishad Election 2026: निवडणुकीची रणधुमाळी सुरू! दोन दिवसांत १८ अर्जांची विक्री, मात्र अधिकृत अर्ज अद्याप शून्य
3

Vidhan parishad Election 2026: निवडणुकीची रणधुमाळी सुरू! दोन दिवसांत १८ अर्जांची विक्री, मात्र अधिकृत अर्ज अद्याप शून्य

Maharashtra Breaking News Updates Today: इंधनाची वाढती मागणी, साठेबाजीचा संशय; कांद्याचा खरेदी दर 15 रुपये किलो
4

Maharashtra Breaking News Updates Today: इंधनाची वाढती मागणी, साठेबाजीचा संशय; कांद्याचा खरेदी दर 15 रुपये किलो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.