Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: भारतात लवकरच येणान १० अन् २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा 

Maharashtra Breaking: भारतातील विविध भौगोलिक भागांतील हवामान, तापमान, आर्द्रता आणि सामान्य नागरिकांकडून होणारा दैनंदिन वापर या परिस्थितीत या प्लास्टिक नोटा किती टिकाऊ आणि उपयुक्त ठरतात, याचे परीक्षण या चाचणीदरम्यान केले जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 28, 2026 | 08:50 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today

Maharashtra Breaking News Updates Today

Follow Us
Follow Us:
  • 28 Jul 2026 08:50 AM (IST)

    28 Jul 2026 08:50 AM (IST)

    Ulhasnagar Honor Killing: उल्हासनगरमध्ये आईनेच आवळला १९ वर्षांच्या मुलीचा गळा 

    Ulhasnagar Honor Killing:   घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोबत सुरू असलेल्या प्रेमसंबंधांना आईचा तीव्र विरोध असतानाही, मुलीने प्रियकरासोबत पळून जाण्याची तयारी केली. या रागातून जन्मदात्या आईनेच स्वतःच्या १९ वर्षीय मुलीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना (Ulhasnagar Honor Killing) समोर आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी आईविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला तातडीने अटक केली आहे.

  • 28 Jul 2026 08:40 AM (IST)

    28 Jul 2026 08:40 AM (IST)

    Jalna Rain Gauge Scam: जालन्यात  तब्बल ४० केंद्रांवर बर्फाचे तुकडे ठेवून पाऊस दाखवला

    Jalna Rain Gauge Scam:  जालना जिल्ह्यात हवामान आणि पर्जन्यमापनाबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील ४९ स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी तब्बल ४० केंद्रांमधील पर्जन्यमापक (Rain Gauge) उपकरणांमध्ये छेडछाड करण्यात आल्याची माहिती जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी दिली आहे. ज्या दिवशी प्रत्यक्षात पाऊस पडलाच नव्हता, त्या दिवशी पर्जन्यमापक उपकरणांवर बर्फाचे तुकडे ठेवले गेले. बर्फ वितळल्यानंतर उपकरणाने पावसाची खोटी नोंद घेतली. उपकरणातील सेन्सर आणि यंत्राच्या रिंग तोडून पर्जन्यमापनाच्या आकडेवारीत फेरफार करण्यात आला.

  • 28 Jul 2026 08:30 AM (IST)

    28 Jul 2026 08:30 AM (IST)

    Jantar Mantar Protest: 'जेन झी' पिढीच्या डोक्यात 'केमिकल लोचा : विश्वास नांगरे पाटील

    Jantar Mantar Protest:  दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाने (Jantar Mantar Protest) संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. एकीकडे संपूर्ण देशात या तरुणांचे कौतुक होत असताना, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी 'जेन झी' पिढीबाबत व्यक्त केलेल्या एका मतामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलतर्फे आयोजित सोहळ्यात बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले, "आजची 'जेन झी' पिढी सतत मोबाईल आणि डिजिटल पडद्यावर व्यस्त असते. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्यांच्या विचार करण्याची आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात एक प्रकारे 'केमिकल लोचा' झाला आहे."

Maharashtra to National And International Breaking News: 

Polymer Currency Notes: भारतात लवकरच येणान १० अन् २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा 

कागदी नोटांच्या तुलनेत अधिक टिकाऊ आणि सुरक्षित असलेल्या प्लास्टिकच्या (पॉलिमर) नोटा लवकरच भारतीयांच्या हातात पाहायला मिळणार आहेत. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पॉलिमर नोटांच्या पायलट प्रोजेक्टला (Pilot Project) अधिकृत मंजुरी दिली आहे.

या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाअंतर्गत देशात १० आणि २० रुपयांच्या प्रत्येकी १००-१०० कोटी पॉलिमर नोटा चाचणीसाठी (Field Trial) चलनात आणल्या जाणार आहेत. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, आरबीआयच्या पॉलिमर नोटांच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली असून सध्या हा केवळ एक प्रायोगिक प्रकल्प आहे.

 

Web Title: 28 july 2026 live breaking news marathi maharashtra politics cjp protest delhi students protest jantar mantar rbi national international news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • national news
  • pune news

संबंधित बातम्या

‘मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन,’ मोशी कचरा डेपो अपघातावरून विजय वडेट्टीवार यांचा प्रशासनावर निशाणा
1

‘मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन,’ मोशी कचरा डेपो अपघातावरून विजय वडेट्टीवार यांचा प्रशासनावर निशाणा

क्रीडा शिक्षकच नसले तर खेळाडू कसे घडणार? भरती रखडल्याने आमरण उपोषणाला सुरूवात; ४ हजार ८६० पदांची भरती…
2

क्रीडा शिक्षकच नसले तर खेळाडू कसे घडणार? भरती रखडल्याने आमरण उपोषणाला सुरूवात; ४ हजार ८६० पदांची भरती…

Sonam Wangchuk Discharged: मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनम वांगचुक थेट राजघाटावर; महात्मा गांधींना वाहिली आदरांजली
3

Sonam Wangchuk Discharged: मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनम वांगचुक थेट राजघाटावर; महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

‘तुला १० वी जमणार नाही’ म्हणणाऱ्यांना वर्ल्ड रेकॉर्ड करत उत्तर! रॅपर हेमंत शिंदेचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद
4

‘तुला १० वी जमणार नाही’ म्हणणाऱ्यांना वर्ल्ड रेकॉर्ड करत उत्तर! रॅपर हेमंत शिंदेचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.