
Maharashtra Breaking News Updates Today:
28 May 2026 10:43 AM (IST)
काही प्राण्यांचे नशीब इतके अजब असते की त्यांच्यावर थेट देशाच्या सरकारला निर्णय घ्यावा लागतो. सध्या शेजारील देश बांगलादेशातून अशीच एक थक्क करणारी आणि अत्यंत रंजक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’च्या अहवालानुसार, बांगलादेशात सध्या एका म्हशीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या म्हशीचे नाव चक्क अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवरून ‘डोनाल्ड ट्रम्प’ (Donald Trump) ठेवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यंदाच्या बकरीदच्या (ईद-उल-अझहा) पवित्र सणा निमित्त या म्हशीचा बळी दिला जाणार होता. तिची विक्रीही झाली होती. मात्र, ऐन वेळी बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने थेट हस्तक्षेप करत या म्हशीचा बळी देण्यास बंदी घातली आणि तिचा जीव वाचवला.
28 May 2026 10:33 AM (IST)
दिल्लीतील प्रमुख सरकारी अभियांत्रिकी (Engineering) महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी एक आनंदाची बातमी आहे. संयुक्त प्रवेश समितीने म्हणजेच ‘जॅक दिल्ली’ने (Joint Admission Committee – JAC Delhi) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.टेक (B.Tech) आणि बी.आर्क (B.Arch) कोर्सेसच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. याला जेईई मेन २०२६ (JEE Main 2026) परीक्षा दिलेले विद्यार्थी आता अधिकृत पोर्टलद्वारे अर्ज करू शकतील.
28 May 2026 10:23 AM (IST)
नागपूर जिल्ह्यातून एक भीषण प्रकार समोर आला आहे. एका शेतातील जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मृतदेह एवढा जळाला की स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पारशिवनी परिसरातील आहे.
28 May 2026 10:13 AM (IST)
जागतिक ऊर्जा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत नाट्यमय आणि ऐतिहासिक बदल पाहायला मिळत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अतिशय महत्त्वाचा आणि धाडसी खुलासा केला आहे. अनेक वर्षांचा राजकीय तणाव, जुने वाद आणि एकमेकांवर लादलेले कठोर आर्थिक निर्बंध विसरून व्हेनेझुएला आता अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचा धोरणात्मक आणि ऊर्जा पुरवठादार भागीदार देश बनत चालला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या नवीन भूमिकेमुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाची मक्तेदारी असलेल्या रशिया आणि सौदी अरेबियासारख्या देशांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
28 May 2026 10:03 AM (IST)
‘धुरंधर’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या प्रोजेक्ट्ससाठी काम केलेले प्रॉडक्शन डिझायनर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. एका महिलेने त्याच्यावर अत्याचार, डांबून ठेवणे आणि शारीरिक मारहाणीचे गंभीर आरोप केले आहे. आरोपीची जामिनावर सुटका झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
28 May 2026 09:35 AM (IST)
Pune Ahilyanagar Crime: पुणे शहरात एकेकाळी आपली मोठी दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आंदेकर टोळीबाबत (Andekar Gang) एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. या टोळीतील प्रमुख म्होरके आणि अनेक गुंड सध्या तुरुंगात असले, तरी त्यांचे इतर सक्रिय सदस्य अजूनही गुन्हेगारी कारवायांमध्ये व्यस्त असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या टोळीची दहशत आता केवळ पुण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नसून, शेजारील अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यापर्यंत पसरल्याचे समोर आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंदेकर टोळीच्या ५ अट्टल गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडक कारवाईमुळे अहिल्यानगरात होणारा एक मोठा अनर्थ टळला आहे.
28 May 2026 09:30 AM (IST)
Akasa Air Emergency: बंगळुरूहून भुवनेश्वरला जाणाऱ्या 'अकासा एअरलाइन्स'च्या (Akasa Air) विमानामध्ये बुधवारी रात्री अचानक इंधनाची पातळी खालावल्याने हवेतच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. विमानातील इंधन कमालीचे कमी झाल्याचे लक्षात येताच एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) तातडीने 'इमर्जन्सी' (Emergency) घोषित केली. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात यश आले आणि एक मोठी दुर्घटना टळली.
अकासा एअरच्या बोइंग विमानातील घटना मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना अकासा एअरलाइन्सच्या 'बोइंग ७३७ मॅक्स ८' (Boeing 737 MAX 8 - Flight QP 1503) या विमानात घडली. या विमानातून एकूण १९४ प्रवासी प्रवास करत होते. विमानाने बंगळुरूहून उड्डाण केले होते आणि ते भुवनेश्वरच्या दिशेने जात होते.
28 May 2026 09:25 AM (IST)
IPL 2026: आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आपल्या तुफानी फलंदाजीने नवा इतिहास रचला आहे. न्यू चंदीगड येथील मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) खेळताना वैभवने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत वादळी खेळी केली. त्याच्या या अद्भूत कामगिरीचे कौतुक क्रीडा वर्तुळातून आणि चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.
28 May 2026 09:20 AM (IST)
Kalyan Durgadi Fort: ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या (Durgadi Fort, Kalyan) परिसरातील धार्मिक वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही उफाळून आला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे गुरुवारी किल्ला परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.
प्रशासनाचे आदेश काय आहेत? आगामी बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील ऐतिहासिक मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, या आदेशात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, वर्षातील इतर कोणत्याही दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना किंवा धार्मिक कृत्य करण्यास सक्त मनाई असेल.
28 May 2026 09:15 AM (IST)
Pune News: बकरी त्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे आणि त्याचाच भाग म्हणून पुण्यात सारसबाग बंद ठेवण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव सारसबाग बंद ठेवत असल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. अनेक पुणेकर बाहेरूनच सारसबागेच्या गणपतीचे दर्शन घेऊन नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. वर्षभरापूर्वी या ठिकाणी नमाज पठण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे या ईद च्या पार्श्वभूमीवर सारसबाग बंद ठेवली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत
28 May 2026 09:09 AM (IST)
CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचे एकापाठोपाठ एक मोठे झटके बसत आहेत. गेल्या १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चार वेळा वाढ झाल्यानंतर, आता सीएनजी (CNG) गॅसच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळपासूनच हे नवीन वाढीव दर लागू करण्यात आले आहेत.
पुण्यात सीएनजी @९४.८५ रुपये पुणे आणि परिसरात सीएनजीच्या दरात थेट २.५० रुपये प्रति किलोची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे पुण्यात आता सीएनजीचा दर ९४.८५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी आणि लगतच्या परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर हे नवीन दर लागू झाले आहेत. पुण्यासोबतच नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात १ रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील वाहनधारकांनाही आता सीएनजीसाठी अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे.
Siddaramaiah resignation rumors News: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच कर्नाटकमधील नेतृत्त्व बदलाचा विषय शांततेच्या मार्गाने सोडवण्यात काँग्रेस हायकमांडला यश आले आहे. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगत असले, तरी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज सकाळी ११ वाजता राज्यपाल थावरचंद गहलोत यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली जात आहे.