Child drowning : मुसळधार कोसणाऱ्या पावसामुळे लोकलसेवा ठप्प झालेली आहे. त्यामुळे प्रवाशाचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्टेशनादरम्यान (Kalyan-thakurli railway station) एक दुर्वैवी घटना घडलीय. लोकलमधून उतरून पावसातून वाट काढताना एका आईने आपल्या 4 महिन्यांच्या लेकराला गमावलं. अंबरनाथकडे (Ambernath local) जाणारी लोकल सुमारे 2 तास ट्रॅकवर थांबलेली होती. बराचवेळा झाला तरी रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे काही प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालण्यास सुरुवात केली. कल्याणच्या दिशेने एक छोटं बाळ घेऊन काका आणि बाळाची आईसुद्धा इतर प्रवाशांप्रमाणे चालत होते. त्याचवेळी काकांचा तोल गेला, आणि 4 महिन्यांचं लेकरू त्यांच्या हातातून निसटलं आणि नाल्यात पडलं. वाहत्या पाण्यात हे 4 महिन्याचं लेकरू वाहून गेलं. सुमारे 2.55 मिनिटांच्या आसपास ही घटना घडलीय.
अंबरनाथ लोकल ठाकुल्री आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवाशी उतरून कल्याण च्या दिशेने चालत होते त्यात एक छोटा बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई पण चालत होते अचानक त्या काका च्या हातून चार महिनाचा बाळ हातातून सटकला आणि त्या वाहत्या पाण्यात पडला. #navarashtra pic.twitter.com/QRhyNmmK8r
— Navarashtra (@navarashtra) July 19, 2023
काय करावं कोणाला काहीच सुचत नव्हतं. सारेच हतबल झाले. त्या माऊलीचा आक्रोश व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. ही घटना खूप हृदयद्रावक आहे. मात्र, यात पालकांचा हलगर्जीपणा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अंबरनाथ लोकल ठाकुल्री आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवाशी उतरून कल्याण च्या दिशेने चालत होते त्यात एक छोटा बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई पण चालत होते अचानक त्या काका च्या हातून चार महिनाचा बाळ हातातून सटकला आणि त्या वाहत्या पाण्यात पडला. #navarashtra pic.twitter.com/QRhyNmmK8r
— Navarashtra (@navarashtra) July 19, 2023
राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळतोय. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकलसुद्धा यामुळे ठप्प झाली. अंबरनाथ-बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने बदलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतू ठप्प झालीय.