Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: खरात बाबाच्या पायाचे तीर्थ प्यायला जाणारे ते ४० आमदार कोण? संजय राऊतांचा खोचक सवाल

खरात बाबा दिल्लीत जाऊन कोणाला भेटत होता. काय करत होता, हे तपासात निष्पन्न झालं असेल तर तेही समोर आले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते?

  • By anuradha sagar
Updated On: Mar 28, 2026 | 02:23 PM
Rupali Chakankar Resignation, Sanjay Raut Statement, Ashok Kharat Case Update,

Rupali Chakankar Resignation, Sanjay Raut Statement, Ashok Kharat Case Update,

Follow Us
Follow Us:
  • या प्रकरणात अनेक राजकीय व्यक्तींची नावे समोर आली आहेत
  • खरात बाबाकडून पाणी आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करणारे सरकारमधील ते लोक कोण होते,
  • सरकारने खरातला जणू राजमान्यताच दिली होती
 

Sanjay Raut on Ashok Karat Case:  अध्यात्मिक गुरुच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणारा भोंदू बाबा अशोक खरातवरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकरणात अनेक राजकीय व्यक्तींची नावे समोर आली आहेत. यात पहिले नाव म्हणजे रुपाली चाकणकर. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव समोर आल्याने त्यांच्यावरील दबाव वाढला होता. त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल रात्री उशिरा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. पण रुपाली चाकणकर यांच्याबरोबरच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचेही नाव समोर आले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिका केली आहे.

Middle East Tension : होर्मुझवर आता राज करणार ट्रम्प? त्यांच्या ‘या’ एका विधानाने जगात खळबळ

दिपक केसरकर स्वत: म्हणत आहेत की, मीच का ? इतर 40 आमदारही अशोक खरातकडे जात होते. हे सत्ताधारी पक्षाचे नेतेच सांगत आहेत, मला एकट्यालाच टार्गेट करू नका. ४० आमदार खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते. ते ४० आमदार कोण आहेत. तिथे जाणारे मंत्री कोण होते. याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, खरात बाबाकडून पाणी आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करणारे सरकारमधील ते लोक कोण होते, हेही त्यांनी सांगाव. यासोबतच खरात बाबा दिल्लीत जाऊन कोणाला भेटत होता. काय करत होता, हे तपासात निष्पन्न झालं असेल तर तेही समोर आले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते?, कोणाला भेटत होते?, हे सुद्धा पोलीस तपासात निष्पन्न झालं असेल, तर ते समोर यायला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यातील ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरण आणि नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सरकारवर बोचरी टीका केली आहे. “सरकारने खरातला जणू राजमान्यताच दिली होती,” असा टोला लगावत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अशोक खरातच्या वावराबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ” खरातचा वावर कुठे नव्हता? तो सर्वत्र होता. बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा, इतका त्याचा वावर होता. जणू काही सरकारने त्याला अधिकृत राजमान्यताच दिली होती. ही राजमान्यता देणारे लोक आजही फडणवीसांच्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत. फडणवीसांनी यावर मौन बाळगता सोडता स्पष्टपणे बोलावं.”

LPG Cylinder Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ

 

‘आधी फाशी, मग चौकशी’ – दुटप्पी भूमिकेवर प्रहार

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘सत्यता पडताळली जाईल’ असे विधान केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राऊत यांनी सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. “व्हिडिओची सत्यता कशी पडताळणार? ते किरीट सोमय्यांच्या व्हिडिओचीही सत्यता पडताळणार होते. प्रत्यक्षात अशा प्रकारचे व्हिडिओ आले की त्यांची सत्यता कधीच पडताळली जात नाही, फक्त ठराविक उत्तरं दिली जातात,” असे राऊत म्हणाले. “विरोधी पक्षाच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या असत्या तर आधी फाशी आणि मग चौकशी, असा न्याय झाला असता. पण इथे सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत फाशीचं नावंच नाही; फक्त ‘करू चौकशी, करू चौकशी’ असंच सुरू आहे.” असा टोलाही त्यांनी लगावला.

 

 

Web Title: 40 mlas visited fake baba sanjay rauts explosive claim against maharashtra govt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Maharashtra Politics
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.