Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत जामखेड मतदारसंघातील 40 गावांना जलजीवन मिशन अंतर्गत 42.48 कोटी रुपये मंजूर!

कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण 40 गावांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत 42.48 कोटी रुपयांचा निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. यासाठी शासन दरबारी आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा करत हा मुद्दा शासनाकडे लावून धरला होता. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 09, 2022 | 01:24 PM
कर्जत जामखेड मतदारसंघातील 40 गावांना जलजीवन मिशन अंतर्गत 42.48 कोटी रुपये मंजूर!
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ जामखेड : आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाण्याची असलेली अडचण सोडवण्यासाठी विशेष लक्ष घातले. तसेच ही अडचण कायमची सोडवण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतानाही वेळोवेळी पाहायला मिळाले. याचेच फलितरूप म्हणून कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण 40 गावांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत 42.48 कोटी रुपयांचा निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. यासाठी शासन दरबारी आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा करत हा मुद्दा शासनाकडे लावून धरला होता.

मान्यता मिळालेल्या गावांमध्ये कर्जत तालुक्यातील 19 तर जामखेड तालुक्यातील 21 अशा एकूण 40 गावांचा समावेश करण्यात आला आहे. मतदारसंघातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, असा शब्द आमदार रोहित पवार यांनी दिला होता. आता तो शब्द खरा होत असताना पाहायला मिळत आहे.

संबंधित गावांचे प्रस्ताव दरडोई खर्च कमी असल्याने जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी होते. परंतु, सोलारचा योजनेतील समावेश व डीएसआर किमतीतील बदल या सर्व गोष्टींमुळे जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी असणारे हे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आले. तसेच त्याच्या मंजुरीसाठी आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. यासोबतच अतिरिक्त वाड्या, वस्त्या व गावे देखील जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट होण्यासाठी आमदार रोहितदादांनी स्वतः वैयक्तिक पातळीवर लक्ष घातलं होतं. अखेर त्यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील पाण्याची असलेली गंभीर अडचण दूर होत असल्याचं या माध्यमातून दिसून येत आहे.

यासह दरडोई खर्च कमी असणारे राज्यातील काही प्रस्ताव जिल्हा स्तरावर मंजूर झाले असून त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. ते कामही लवकरच पूर्ण होतील. जल जीवन मिशन योजनेतील ग्रामपंचायतींना व गावकऱ्यांना येणारा खर्च कमी व्हावा या उद्देशाने सोलरचा यात समावेश करण्यात आला आहे, असे आमदार रोहित पवारांनी म्हटले आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेने पाण्याचे स्त्रोत ओळखून प्रमाणित केल्यामुळे या योजनांना मुबलक पाणी मिळणार असून या योजना सातत्याने कार्यक्षम राहतील यात शंका नाही.

समाविष्ट गावांची तालुकानिहाय यादी

कर्जत तालुका

१. निंबे

२. शिंपोरा

३. होलेवाडी

४. म्हाळगी

५. रातंजन

६. शेगुद

७. वडगाव तनपुरा

८. औटेवाडी

९. कुंभेफळ

१०. खंडाळे

११. निंबोडी

१२. कोलवडी

१३. तिखी

१४. बिटकेवाडी

१५. दिघी

१६. लोणी मसादपुर

१७. तोरकवाडी

१८. खातगाव

१९. कांगुडवाडी

जामखेड तालुका

१. बावी

२. मारुली ( गुरेवाडी)

३. गुरेवाडी

४. पारेवाडी (आरणगाव)

५. राजेवाडी

६. आनंदवाडी

७. धानोरे

८. सातेफळ

९. धोंडपारगाव

१०. चोंधेवाडी

११. पिंपळगाव आळवा

१२. खुटेवाडी- मुंजेवाडी

१३. बोर्ले

१४. घोडेगाव

१५. भवरवाडी

१६. खामगाव

१७. सांगवी

१८. झिक्री

१९. आघी

२०. खुरदैठण

२१. तरडगाव

Web Title: 42 48 crore sanctioned under jaljivan mission to 40 villages in karjat jamkhed constituency nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2022 | 01:23 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • Karjat Jamkhed
  • NAVARASHTRA
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
2

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
4

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.