Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News : ओझर्डे येथे कार ओढ्यात कोसळून अपघात; चालक जखमी

पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी पुलावरून जात असताना पुलाला कठडा नसल्याने थेट बाजूच्या ओढ्यात खोलवर कोसळली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 14, 2025 | 03:26 PM
ओझर्डे येथे कार ओढ्यात कोसळून अपघात; चालक जखमी

ओझर्डे येथे कार ओढ्यात कोसळून अपघात; चालक जखमी

Follow Us
Follow Us:

वाई : वाई-वाठार रस्त्यावरील ओझर्डे गावच्या हद्दीत एक अपघात झाला. श्री स्वामी समर्थ मठ, कदमवाडी नजीकच्या पुलाला संरक्षक कठडा नसल्यामुळे एक चारचाकी गाडी ओढ्यात कोसळली. ही घटना रविवारी (दि.१२) दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चालक जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी पुलावरून जात असताना पुलाला कठडा नसल्याने थेट बाजूच्या ओढ्यात खोलवर कोसळली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी गाडीतून जखमी चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. चालकाचे नाव समजू शकले नसले तरी, तो नांदवळ, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील रहिवासी असल्याचे समजते. स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पुलाला कठडा नसल्यामुळे अपघाताचा धोका नेहमीच असतो.

हेदेखील वाचा : फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट

याबाबत बांधकाम विभागाला वारंवार सूचना आणि मागणी करूनही, विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हा पूल धोकादायक बनल्यामुळे बांधकाम विभागाने त्वरित या पुलावर संरक्षक कठडा बसवून भविष्यातील संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात

दुसऱ्या एका घटनेत, अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक भयानक रस्ता अपघात झाला. चकलागम परिसरात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगरावरून खोल दरीत कोसळला. त्यात एकूण २२ कामगार होते, त्यात सर्वांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, यापैकी १९ कामगार आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुकुरी टी इस्टेटचे रहिवासी होते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १३ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित कामगारांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे.

Web Title: A car accident occurred at ozarde when a car fell into a stream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Accident Case
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: वाई नगरपरिषदेत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ कारभार! नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने अधिकारी निरुत्तर
1

Satara News: वाई नगरपरिषदेत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ कारभार! नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने अधिकारी निरुत्तर

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन
2

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र
3

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र

Satara News: सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा! ७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुशांत मोरेंचे गंभीर आरोप
4

Satara News: सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा! ७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुशांत मोरेंचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.