ही गोष्ट आहे 1971 मधली, अॅमेझॉनमध्ये एका भयाण वीजवादळात एक प्रवासी विमान तुकडे-तुकडे झाले. 10 हजार फुट उंचावरुन कोसळलेल्या या विमानाचे जिथे तुकडे तुकडे झाले तिथे विमानातील प्रवाशांचं काय झालं असेल याची कल्पनाही न केलेलीच बरी. या विमनात विमानात 92 प्रवासी होते मात्र यातली एक 17 वर्षाची मुलगी इतक्या मोठ्या अपघातातून बचावली. या अपघातातील ती एकमेव व्यक्ती होती जी त्यातून वाचली. या मुलीचं नाव जुलियाने कोएप्के.
विमान अपघातातून बचावलेली जुलिया आकाशातून अॅमेझॉनच्या जंगलात पडली. त्यावेळच्या तपासांती अहवालानुसार, ते विमान होते LANSA फ्लाइट 508 जे पेरूमधील लीमा येथून पुकाल्पाकडे जात होते.साक्षीदार आणि तपास अहवालांनुसार, एका वादळी ढगसमूहात वीज कोसळल्यामुळे विमानाच्या संरचनेत बिघाड झाला आणि हवेतच विमानाचे तुकडे झाले.
जुलियाने आपल्या सीटच्या रांगेत अडकलेलीच खाली पडली.नंतर संशोधकांनी या अपघातावर केलेल्या अभ्यासातून असं सांगितसलं की सीटची ती रांग हवेत प्रतिकार निर्माण करत होती, ज्यामुळे पडण्याचा वेग कमी झाला आणि तिच्या वाचण्याची शक्यता वाढली. मात्र जुलिया समोर खरं आव्हान पुढे होतं.
जंगलात पडल्यानंतर ती शुद्धीवर आली. इतक्या उंचीवरुन पडल्यानंतर सुजलेले डोळे, शरीरावर झालेल्या जखमा, डोळ्यांना इजा झाल्याने अंधूक दिसत होतं.तिला कोणतेही आवाज ऐकू येत नव्हते ना लोकांचे, ना इंजिनचे, ना बचावकार्याचे.चारही बाजूंनी फक्त अॅमेझॉनचं जंगल पसरलेलं होतं.
ज्या वातावरणात ती पडली होती ते होतं. पेरूमधील अॅमेझॉन जंगल. मोठ्या अपघातातून वाचल्यानंतर आता पुढे संकट होतं ते जंगली प्राण्याचं.विषारी साप.जग्वारसारखे मोठे हिंस्त्र प्राणी. परजीवी कीटक. पाण्यातील घातक जंतू त्यात भरीला भर तिच्या शरीरावर झालेल्या जखमा. दाट झाडी असल्याने सूर्य़रप्रकाश पोहोचत नव्हता.त्यामुळे काही दिसणं देखील कठीण होतं.अशा परिस्थिती ती कशी तग धरुन राहिली त्याची कल्पना देखील करवत नाही.
जुलियाने जंगल कधीच पाहिलं नव्हतं असं नव्हतं.तिचे आई-वडील जर्मन प्राणिशास्त्रज्ञ होते आणि ते जैव संशोधन केंद्रात काम करत होते.
बालपणातच तिने वनस्पती ओळखणं, धोके टाळणं आणि पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यास माणसं सापडण्याची शक्यता वाढते याचं शिक्षण तिला मिळालं होतं आणि हेच शिक्षण तिला जीव वाचवण्यासाठी कामी आलं.
तिला एक लहान ओढा सापडला आणि ती त्याच्या दिशेने चालू लागली.तो ओढा पुढे मोठ्या पाणवठ्यांपर्यंत गेला अगदी तिने शिकल्याप्रमाणे.
अन्न अत्यंत कमी होतं. पाणी प्यायला मिळालं नाही तर नक्कीच जीव जाणार हे निश्चित होतं. तिने धोका पत्करून नदीचं पाणी प्यायलं.
तिच्या जखमा अधिक खोल होत गेल्या.तिला समजलं की एका जखमेत कीटकांनी अळ्या घातल्या होत्या उष्णकटिबंधीय जंगलात हे सामान्य आहे.
तरीही ती चालत राहिली.
सुमारे अकरा दिवसांनंतर, तिला लाकूडतोड कामगारांनी वापरलेला एक साधा निवारा सापडला.
दुसऱ्या दिवशी कामगार तिथे आले. त्यांनी प्राथमिक उपचार केले.त्यानंतर तिला बोटीने अनेक तास प्रवास करून जवळच्या गावात आणि वैद्यकीय मदतीपर्यंत नेण्यात आलं.डॉक्टरांनी तिचा विमान अपघात आणि त्यातून वाचल्यानंतरचे ते 11 दिवस ती जे तग धरुन राहिली त्यावर आश्चर्य व्यक्त केलं.
बचावानंतरजुलियाची तिच्या वडिलांशी भेट झाली.दुर्दैवाने, तिची आई त्याच विमानात होती आणि त्यात ज्युलियाच्या आईचा मृत्यू झाला.
ज्या कठीण परिस्थितीतून ज्युलियाला दोनदा मिळालेला हा पुनर्जन्म होता. त्यानंतर जुलियाने जीवशास्त्र हे क्षेत्र निवडलं, डॉक्टरेट पूर्ण केली आणि अॅमेझॉनशी संबंधित संशोधनात योगदान दिलं.तिची कथा शैक्षणिक अभ्यास, माहितीपट आणि तिच्या आत्मचरित्रातून जगासमोर आली.
जुलियाच्या जगण्याकडे अनेकदा पुढील उदाहरण म्हणून पाहिलं जातं. कारण तिचं फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर तिची जगण्याची जिद्द देखील होती.तिला जीव वाचवण्यासाठी ज्ञान हे सर्वात प्रभावी साधन ठरलं. शांत निर्णयक्षमतेने तिने भीतीवर मात केली.प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी तयारी दाखवली. फक्त शारीरिक ताकदीमुळेच ती वाचली नाही. शिक्षण आणि निर्भीड वृत्तीमुळे ती तग धरु शकली. ज्युलिया आज अनेकांना जगण्यासाठी प्रेरणा देत आहे.
Ans: जुलियाने कोएप्के ही 17 वर्षांची जर्मन वंशाची मुलगी होती. 1971 साली पेरूमधील अमेझॉन जंगलात झालेल्या भीषण विमान अपघातातून ती एकमेव जिवंत बचावलेली व्यक्ती होती.
Ans: हा अपघात LANSA फ्लाइट 508 या विमानाचा होता, जे पेरूमधील लीमा येथून पुकाल्पाकडे जात होते.
Ans: तिला गंभीर जखमा झाल्या होत्या, डोळे सुजले होते, अंधूक दिसत होते आणि ती एकटी अमेझॉनच्या दाट जंगलात अडकली होती. विषारी साप, हिंस्त्र प्राणी, कीटक, संसर्ग आणि अन्न-पाण्याचा अभाव ही मोठी आव्हाने होती.






