Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लिव्हिंग विल’साठी डिजिटल प्लॅटफॉर्म! शेती वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करताना कंपनीचे दोन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यावर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2026 | 03:00 PM
'लिव्हिंग विल'साठी डिजिटल प्लॅटफॉर्म! शेती वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

'लिव्हिंग विल'साठी डिजिटल प्लॅटफॉर्म! शेती वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

नागरिकांची ‘लिव्हिंग विल’ म्हणजेच वैद्यकिय इच्छापत्र कायमस्वरूपी जतन करण्यासाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. त्यांचे जतन करण्यासाठी कस्टोडियन म्हणजेच संरक्षकाचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. नगरविकास विभागाने याबाबतचा जीआर जारी केला आहे. अर्थात हे फक्त वैद्यकिय इच्छापत्र असून त्याचा संपत्तीशी संबंधित विल म्हणजे इच्छापत्राशी कोणताही संबंध असणार नाही.(फोटो सौजन्य – istock)

Amravati जिल्ह्यात १५ महिन्यात ७०४ आगीच्या घटना, मार्च महिन्यात सर्वाधिक घटना; MIDC तील उपकेंद्र १० वर्षांपासून बंद

अनेकदा व्यक्ती आजारपण किंवा अपघातामुळे कोमा सारख्या अवस्थेत पोहोचते त्यामुळे स्वतःवर पुढील वैद्यकिय उपचार सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय ती स्वतः घेऊ शकत नाही. अशा वेळी ती वेदनादायक अवस्था सुरू ठेवायची की पुढचा निर्णय घ्यायचा याबाबत नातेवाईक व डॉक्टर यांची बिकट अवस्था होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयानेच याबाबतच्या प्रक्रियेला कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यानुसार व्यक्ती सुदृढ असताना आपल्यावर भविष्यात अशी स्थिती निर्माण झाल्यास काय निर्णय घ्यायचा याचे लिव्हिंग विल म्हणजेच वैदयकिय इच्छापत्र तयार करू शकतो. त्याला अॅडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्हज असेही म्हणतात. त्यात लाईफ सपोर्ट सुरू ठेवायचा किंवा नाही. हृदयाचे ठोके थांबल्यास पुनरुज्जीवन करायचे की नाही. व्हेंटिलेटर सुरू ठेवायाच किंवा नाही. अन्नासाठी नळ्यांचा वापर करायचा की नाही. मृत्यूनंतर अवयवदान करायचे की नाही, हे देखील यात नमूद करता येते.

महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करताना कंपनीचे दोन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यावर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांना वीज पुरवठा आणि संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) कंपनीवर देण्यात आली आहे. तर औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती आणि इतर सर्व बिगर कृषि ग्राहकांना महावितरण ही कंपनी वीज पुरवठा करेल. नवीन स्थापन होणाऱ्या कृषि वितरण कंपनीला सुरूवातीचे भांडवल म्हणून २ हजार ५०० कोटी रुपयांचे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.

अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट! उमरखेड-महागाव तालुक्यातील स्थिती; विविध रोगाचा प्रादुर्भाव

याशिवाय महावितरण कंपनीला भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यास देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महावितरण कंपनीने विविध पायाभूत योजनांसाठी घेतलेल्या सुमारे ३२ हजार ६७९ कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी आहे. या कर्ज दायित्वापोटी महाराष्ट्र सरकार १५ वर्षे मुदतीचे दीर्घकालीन सरकारी रोखे जारी करणार आहे. यामुळे महावितरणवरील कर्जाचा बोजा कमी होऊन आर्थिक स्थिती आणखी चांगली होण्यास मदत होणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: A digital platform for living will an independent company for agriculture power supply an important decision of the state govt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Amaravati
  • electricity
  • maharashra news

संबंधित बातम्या

पीककर्ज दरात १२ टक्के वाढ! कर्जमाफीमुळे प्रति हेक्टर पीककर्जाची मर्यादा निश्चित; लक्ष्य मात्र अनिश्चित
1

पीककर्ज दरात १२ टक्के वाढ! कर्जमाफीमुळे प्रति हेक्टर पीककर्जाची मर्यादा निश्चित; लक्ष्य मात्र अनिश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.