सौजन्य : सोशल मीडिया
मुंबई : अंबरनाथ शहरात एका केमिकल कारखान्यातून गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या गॅसचा धूर संपूर्ण शहरात पसरला. ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली. या गॅस गळतीमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. त्यात काहींना डोळ्यात आणि घशात जळजळ तर काहींना अनेक त्रास जाणवला. या गॅस गळतीमुळे धुराचे अक्षरश: लोट पसरल्याचे दिसून आले.
हेदेखील वाचा : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, मरीन ड्राईव्ह- वांद्रे फक्त 10 मिनिटांचा प्रवास, काय आहे ‘या’ मार्गाची वैशिष्ट्ये
या गॅस गळतीमुळे वायूच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना नाक आणि तोंड झाकून परिसरातून बाहेर जावे लागले. हा वायू रेल्वे रुळावर पोहोचल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, या गॅस गळतीचे कारण शोधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पथके पाठवण्यात आली आहेत. असे असल्याने अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील मोरिवली एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीतून गॅस गळती झाल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्धभवत आहेत. अनेकांना उलट्या होत आहेत, तर काहींना घसा खवखवण्याचा त्रास जाणवत आहे. दरम्यान, ही वायू गळती का झाली याची कारण अद्याप समजू शकलं नाही.
संपूर्ण शहर भीतीच्या छायेखाली
अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखान्यात गॅसची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांना डोळ्यांची जळजळ आणि घसादुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांना गुदमरल्याचा त्रासही जाणवला. अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.
रात्री उशीरा मिळाली गॅस गळतीची माहिती