संग्रहित फोटो
पुणे : टेम्पो लावण्यास (Tempo Issue) जागा न मिळाल्यावरून वाद झाला होता. या वादानंतर एका व्यक्तीला हाताने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या छातीत बुक्की मारून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील (Crime in Pune) खराडी भागात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकास विमानतळ पोलिसांनी (Vimantal Police) अटक केली.
जैनुद्दीन मोहम्मद नदाफ (वय 48, रा. विकासनगर, कलवड वस्ती, लोहगाव) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक अमोल नारायण सूर्यवंशी (वय 27, रा. रायसोनी कॉलेजसमोर, वाघोली) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत बशीर मोहम्मद नदाफ (वय 36) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बशीर यांचा भाऊ जैनुद्दीन, पुतण्या सुलतान आणि मतीन बागवान नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका चौकात रिक्षा लावून गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी टेम्पोचालक सूर्यवंशी तेथे आला. त्याला टेम्पो लावण्यास जागा न मिळाल्याने वाद झाला. सूर्यवंशीने जैनुद्दीनच्या छातीत ठोसा मारला. त्याला मारहाण केली. बेशुद्धावस्थेतील जैनुद्दीनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता माळी तपास करत आहेत.