शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
काजू बिया बरोबरच काजूची बोंडे (मुरटा) वेळीच खरेदी विक्री होत नसल्याने काजूची बोंडे झाडाच्या सावलीत कुजून वाया जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या काजूच्या बोडांचा मद्यासाठी वापर केला जातो. दरवर्षी तालुक्यातील गावातून शेकडो टॅम्पो काजूची बोंडे भरुन गोव्याला जातात. मात्र या वर्षी गोव्यातील व्यावसायिक कमी प्रमाणात येत असल्याचे समजते.
दराबाबत वाचा कोण फोडणार?
अवघ्या तीन ते चार महिण्याच्या कमी कालावधीत जादा उत्पादन आणि पैसा मिळवून देणारे पीक म्हणून या व्यवसायाकडे शेतकरी वळला आहे.ऊसाच्या पिकात शेतीच्या बांधावर तसेच खास करुन काजूचे पीकच फायदेशीर ठरते, म्हणून आपल्या चांगल्या व कसदार जमिनीमध्ये वैगुर्ला काजूच्या रोपांची महागड्या दराचा विचार नकरता खरेदी करुन ती रोपे लागवड करण्यात शेतकरी चळला आहे.दिवसेंदिवस काजूच्या व्यवसायाकडे शेतक-यांनी अधिक लक्ष दिले जात आहे. परंतु नैसर्गिक हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना यावा तोटा सहन करावा लागत आहे.
बाजार समितीचे सभापती आणि पदाधिकारी यानी शेतकऱ्यांच्या भात, नाचणी, मक्का, काजू आदी मालाच्या खरेदी विक्री कडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मालाला दराबाबत वाचा फोडणार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. व्यापाऱ्यांकडून मनमानी दराने खरेदीशिवाय व्यापारी शेतकऱ्यांचीवर्गाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची एकजूट आणि संघटना नसल्यामुळे व्यापारी आपली संघटना करुन मनमानी दर ठरवत आहेत. शेतकरी नाईलाजाने काजू बाजारात नेऊन विकत आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात असून वातावरणासह दराचाही फटका सहन करावा लागत आहे.






